सेल्फी स्पेशल विवो व्ही ७ प्लस झाला स्वस्त
By शेखर पाटील | Published: March 2, 2018 03:29 PM2018-03-02T15:29:30+5:302018-03-02T15:42:53+5:30
विवो कंपनीने खास करून सेल्फी प्रेमींसाठी सादर केलेल्या व्ही ७ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात २ हजार रूपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे.
विवो कंपनीने खास करून सेल्फी प्रेमींसाठी सादर केलेल्या व्ही ७ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात २ हजार रूपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. विवो कंपनीने गेल्या वर्षीच्या सप्टेबर महिन्यात विवो व्ही ७ प्लस हा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला होता. याचे मूल्य २१,९९० रूपये होते. आता यात २ हजार रूपयांची कपात करण्यात आली असून हा स्मार्टफोन ग्राहकांना १९,९९० रूपये मूल्यात फ्लिपकार्ट व अमेझॉनसह देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार विवो व्ही ७ प्लस या स्मार्टफोनमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. यात एफ/२.० अपार्चर आणि मूनलाईट ग्लो सेल्फी फ्लॅशयुक्त २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. यात फेस ब्युटी, ग्रुप सेल्फी आणि पोर्ट्रेट मोड आदी फिचर्स दिलेले आहेत. याच्या मदतीने दर्जेदार सेल्फी घेता येतात. तर याचा मुख्य कॅमेरा एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे.
विवो व्ही ७ प्लस या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि एचडी (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू १९:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण आहे. या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर असून याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.
विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित फनटच ओएस ३.२वर चालणारा आहे. तर यातील बॅटरी ३२२५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत.