फक्त 1 हजारात शेतातील पाण्याचे प्रमाण समजणार...पाणी वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 02:19 PM2019-07-03T14:19:33+5:302019-07-03T14:20:32+5:30
स्मार्ट शेती म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे.
फक्त एक मिसकॉल देऊन शेतातील पंप चालू किंवा बंद करता येतो. हो हे खरे आहे. यामुळे शेती लांब असेल तर जाण्या येण्याचा खर्चही वाचत आहे. तसेच सध्या आपल्याकडील शेतकरी काहीसे स्मार्ट शेती करण्याकडे कल दाखवत आहेत. खूप मोठा खर्च न करता शेतीला आपोआप पाणी देण्याची आणखी एक युक्ती आम्ही घेऊन आलो आहोत. यासाठी 1 ते 5 हजार रुपयांचा खर्च येतो.
स्मार्ट शेती म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे. जर तुम्हाला शेतीला पाणी द्यायला उशिर झाला तर पिकांचे नुकसान होऊ शकते. शिवाय बाजारात गेला असाल, किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल तर शेतीला पाणी देण्याची चिंता सारखी सतावत राहते. आता तुम्हाला घरबसल्या किंवा जिथे असाल तिथे शेतातील जमिनीमध्ये पाण्याची मात्रा किती आहे, हे कळू शकते. हे समजल्यावर मग एका मिसकॉलमध्ये शेती पंप सुरू करून पाण्याची योग्य मात्रा समजल्यावर पुन्हा बंदही करू शकता.
मातीतील पाण्याचे प्रमाण समजल्याने पंप वेळेवर बंद केल्यास पाणी वायाही जाणार नाही. दुष्काळाच्या काळात हे तंत्रज्ञान तर संजिवनी आहे. हा एक सेन्सर आहे. बाजारात अशाप्रकारचे सेन्सर 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लास्टवेयर रॉक्स प्लांट मॉयश्चर इंडीकेटर, डॉ. मीटर एस 10, टेक सोर्स सोल्यूशन सेंसर अशी यांची नावे आहेत. या सेन्सरसाठी कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवर किंवा किसान ई स्टोअरवर मागणी नोंदविता येते. तामिळनाडू, कर्नाटकासह राजस्थानच्या शेतकऱ्यांनी अशा सेन्सरचा वापर सुरू केला आहे.
याचबरोबर उष्णता, कीटक यांची माहितीही देणारे सेन्सर बाजारात उपलब्ध आहेत. सूर्याचे उन किती आहे ते देखिल हे सेन्सर सांगतात. तामिळनाडूतील कोईंम्बतूरमधील ऊस संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी शेतातील मातीमध्ये पाण्याचे प्रमाण सांगणारा हा सेन्सर बनविला आहे.