हर्मन कार्दोनच्या उत्पादनांची मालिका भारतात सादर

By शेखर पाटील | Published: October 26, 2017 04:00 PM2017-10-26T16:00:00+5:302017-10-26T16:00:00+5:30

हर्मन कार्दोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत एकचदा तब्बल २४ उत्पादने लाँच केले असून ती ग्राहकांना ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येणार आहेत. सॅमसंगची मालकी असणारी हर्मन कार्दोन कंपनी आपल्या दर्जेदार ऑडिओ डिव्हाईसेससाठी ख्यात आहे

A series of Harmonine Cardon products launched in India | हर्मन कार्दोनच्या उत्पादनांची मालिका भारतात सादर

हर्मन कार्दोनच्या उत्पादनांची मालिका भारतात सादर

Next
ठळक मुद्देभारतात पाया मजबूत करत असतांना हर्मनने आता एकदचा तब्बल २४ प्रॉडक्ट लाँच केले आहेतही सर्व उपकरणे १,११९ ते ३९,९९० रूपयांच्या दरम्यान उपलब्ध करण्यात आली असून ग्राहकांना ते सॅमसंगच्या शॉपीजसह सर्व शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येतील

हर्मन कार्दोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत एकचदा तब्बल २४ उत्पादने लाँच केले असून ती ग्राहकांना ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येणार आहेत. सॅमसंगची मालकी असणारी हर्मन कार्दोन कंपनी आपल्या दर्जेदार ऑडिओ डिव्हाईसेससाठी ख्यात आहे. अलीकडच्या काळात या कंपनीने भारतीय बाजारपेठेतवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने गेल्या वर्षी भारतात जेबीएल क्लीप २ आणि हर्मन कार्दोन गो प्लस प्ले मिनी ही दोन उपकरणे लाँच केली होती. यानंतर या वर्षाच्या सुरवातीला कंपनीने देशात तीन सर्व्हीस सेंटर सुरू केले. तर आता हर्मनचे आता मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू आदी मेट्रोजमध्ये सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे भारतात पाया मजबूत करत असतांना हर्मनने आता एकदचा तब्बल २४ प्रॉडक्ट लाँच केले आहेत. ही सर्व उपकरणे १,११९ ते ३९,९९० रूपयांच्या दरम्यान उपलब्ध करण्यात आली असून ग्राहकांना ते सॅमसंगच्या शॉपीजसह सर्व शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येतील.

हर्मन कार्दोनच्या या उपकरणांमध्ये जेबीएल फ्लिप ४ पोर्टेबल स्पीकर, जेबीएल पल्स ३ वॉटरप्रूफ ब्ल्यु-टुथ स्पीकर, जीबीएल फ्लिप ४, हर्मन कार्दोन ट्रॅव्हलर, जेबीएल सिनेमा एसबी४५० व इन्फीनिटी कप्पा परफेक्ट ६०० या ध्वनी प्रणालींचा समावेश आहे. तर हर्मनने अलीकडेच लाँच केलेले गुगल असिस्टंटयुक्त  लिंक १०, लिंक २० आणि लिंक ३०० हे स्मार्ट स्पीकर लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सॅमसंगने हर्मन कार्दोन कंपनीला सुमारे ८ अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहीत केले होते. यानंतर सॅमसंगने या कंपनीचा ग्लोबल पातळीवर वेगाने विस्तार करण्याची रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने भारतासारख्या सॅमसंगचा पाया पक्का असणार्‍या विशाल बाजारपेठेत हर्मनची उपकरणे लाँच करण्यात येत आहेत. यानुसार भारतीय ग्राहकांना हर्मन कार्दोनची उत्पादने सादर करण्यात आल्याचे मानले जात आहे.

Web Title: A series of Harmonine Cardon products launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.