तुमच्या नकळत होऊ शकतो तुमचा फोन हॅक; आले Pegasus चे नवीन आणि अत्यंत घातक व्हर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:48 PM2021-08-26T18:48:34+5:302021-08-26T18:49:41+5:30
Pegasus spyware: काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या Pegasus spyware चा नवीन व्हर्जन दिसला आहे, जो आधीपेक्षा घातक आहे.
जुलैमध्ये देशात Pegasus वायरसची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. जेवढी ही बातमी राजकीय वर्तुळासाठी महत्वाची होती तेवढीच चर्चा टेक विश्वात देखील सुरु होती. आता पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण TechCrunch च्या रिपोर्टनुसार Pegasus iPhone hack चे पुनरागमन झाले आहे.
इज्राइलमधील सायबर फर्म NSO Group ने 2016 मध्ये Pegasus ची निर्मिती केली होती. जुलैमध्ये हा स्पायवेयर चर्चेत आला होता. आयमेसेजला टार्गेट करणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयफोन हॅक असल्याचे देखील म्हटले गेले होते. आता या वायरसचा नवीन व्हर्जन आला आहे, जो Apple ची सध्याचे सिक्योरिटी स्टँडर्ड्सना सहज बगल देतो.
Pegasus चे नवीन व्हर्जन
Pegasus चे नवीन व्हर्जन एक Zero Click अटॅक आहे, म्हणजे युजरने काहीच न करता पेगासस स्पायवेयर आयफोन हॅक करू शकतो. Citizen Lab ने नवीन पेगासस हॅकचा शोध लावला आहे. नवीन पेगाससचा झिरो क्लिक अटॅक लेटेस्ट आयफोन ऑपरेटिंग सिस्टम iOS 14.4 आणि iOS 14.6 ला मात देऊ शकतो. म्हणून हा हॅक महत्वाचा ठरतो. इतकेच नव्हे तर ब्लास्टडोर पद्धतीचा वापर करून नवीन वायरस iOS 14 वरील नवीन सॉफ्टवेयर सिक्योरिटी फीचर निकामी करतो, अशी माहिती टेकक्रंचने दिली आहे.