शाओमी मी मिक्स २: जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: September 11, 2017 05:46 PM2017-09-11T17:46:32+5:302017-09-11T17:48:11+5:30

शाओमी कंपनीने मी मिक्स २ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन तीन स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीने आयफोन लाँचिंगच्या आदल्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध उत्पादनांची घोषणा केली

Shaomi Mi Mix 2: Know all the features | शाओमी मी मिक्स २: जाणून घ्या सर्व फिचर्स

शाओमी मी मिक्स २: जाणून घ्या सर्व फिचर्स

Next
ठळक मुद्देया स्मार्टफोनमधील मागच्या बाजूला १२ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतीलसेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात फेस रिकग्नीशन तंत्रज्ञानाने सज्ज असणारा ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे

शाओमी कंपनीने मी मिक्स २ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन तीन स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीने आयफोन लाँचिंगच्या आदल्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध उत्पादनांची घोषणा केली. यात शाओमी मी मिक्स २ या स्मार्टफोनचा समावेश आहे. मी मिक्स २ हा स्मार्टफोन सहा जीबी रॅम आणि ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या तीन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. तर याचे आठ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट शाओमी मी मिक्स २ ‘स्पेशल एडिशन’ या नावाने बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे. या विशेष आवृत्तीत सिरॅमिक युनिबॉडी देण्यात आली असून मुख्य कॅमेरा सेन्सरवर सोनेरी आवरण असेल.

शाओमी मी मिक्स २ या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा, फुल एचडी क्षमतेचा (२१६० बाय १०८० पिक्सल्स) आणि १८:९ गुणोत्तर असणारा सुपर अमोलेड फुल स्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसरने सज्ज असेल. ड्युअल सीमकार्डची सुविधा असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानासह यात ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी मिक्स २ या स्मार्टफोनमधील मागच्या बाजूला १२ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यातील पहिल्या कॅमेर्‍यात ड्युअल एलईडी फ्लॅश, सोनी आयएमएक्स ३८६ सेन्सर, चार अंशीय ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, पीडीएएफ आणि एचडीआर आदी फिचर्स असतील. तर दुसर्‍या कॅमेर्‍यात ड्युअल फ्लॅश दिलेला असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात फेस रिकग्नीशन तंत्रज्ञानाने सज्ज असणारा ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोरजी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. शाओमी मी मिक्स या स्मार्टफोनला पहिल्यांदा चीनी बाजारपेठेत उतरण्यात येणार असून येत्या काही महिन्यांमध्ये भारतात हे मॉडेल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Shaomi Mi Mix 2: Know all the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.