जगातील सर्वात हलका 5G Phone सादर; जाणून घ्या SHARP AQUOS zero6 ची वैशिष्ट्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:35 PM2021-09-30T19:35:16+5:302021-09-30T19:35:24+5:30

Latest 5G Phone SHARP AQUOS zero6: SHARP AQUOS zero6 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, 8GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे.  

Sharp aquos zero6 lightest 5g smartphone launched   | जगातील सर्वात हलका 5G Phone सादर; जाणून घ्या SHARP AQUOS zero6 ची वैशिष्ट्ये 

जगातील सर्वात हलका 5G Phone सादर; जाणून घ्या SHARP AQUOS zero6 ची वैशिष्ट्ये 

Next

Sharp कंपनीने जगातील सर्वात सर्वात हलका 5G Smartphone लाँच केला आहे. फोनचे वजन कमी ठेवताना या जपानी कंपनीने बॅटरी आणि डिस्प्लेमध्ये तडजोड केली नाही. हा स्मार्टफोन SHARP AQUOS zero6 नावाने सादर करण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, 8GB रॅम आणि 48MP चा कॅमेरा असे स्पेक्स देण्यात आले आहेत.  

SHARP AQUOS zero6  

या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 2340 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 240Hz रिफ्रेश रेटसह येणाऱ्या डिस्प्लेला Gorilla Glass Victus चे प्रोटेक्शन मिळते. प्रसेसिंगसाठी हा डिवाइस Qualcomm Snapdragon 750G चिपसेट आणि 8GB RAM ची मदत घेतो. यातील स्टोरेज 128GB आहे, जी 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 11 वर चालतो. 

SHARP AQUOS zero6 स्मार्टफोनमधील क्वॉड कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 8MP 2x टेलीफोटो शूटर आणि ToF सेन्सर मिळतो. हा फोन 12.6MP च्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. शार्पच्या या स्मार्टफोनमध्ये 4,010mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे वजन फक्त 146 ग्राम आहे.  

कनेक्टिविटीसाठी हा फोन 5G, ड्युअल-बँड WiFi, Bluetooth 5.1, ड्युअल-बँड GNSS, NFC आणि USB Type-C सपोर्ट देण्यात आला आहे.सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP68 सर्टिफिकेशन्स मिळते. कंपनीने या डिवाइसची किंमत मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. परंतु हा जपानमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे.  

Web Title: Sharp aquos zero6 lightest 5g smartphone launched  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.