AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:08 PM2023-03-30T14:08:48+5:302023-03-30T14:09:25+5:30

ChatGPT लॉन्च झाल्यानंतर AI बॉट्सची जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

Shut down AI technology immediately; Elon Musk and co-founders of Apple demand, why..? | AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..?

AI तंत्रज्ञान तात्काळ बंद करा; Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकांची मागणी, कारण काय..?

googlenewsNext


ChatGPT लॉन्च झाल्यानंतर AI बॉट्सच्या कहाणीला एक वेगळे वळण मिळाले आहे. कारण, यापूर्वी AI वर इतकी चर्चा कधीच झाली नव्हती. नुकतेच याचे नवीन व्हर्जन GPT-4 लॉन्च झाले आहे लोक वेगाने विकसित होणाऱ्या या तंत्रज्ञानाबाबत चिंतेत आहेत. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि इतर तंत्रज्ञान जानकारांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानावर बंदी घातली पाहिजे.

AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून पाहिले जात होते, पण आता हे सत्यात उतरले आहे. या क्षेत्रात सातत्याने कामे होत आहेत. ChatGPT आल्यानंतर सामान्यांचे लक्ष याकडे वळले आहे. काहीजण या तंत्रज्ञानाला मानवतेचा शत्रू म्हणत आहेत. Elon Musk आणि Apple च्या सह-संस्थापकाने AI डेव्हलपमेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कारण तसे झाले नाही, तर हे तंत्रज्ञान मानवतेचे शत्रू होऊ शकतात. त्यांचा असा विश्वास आहे की AI नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. 

असा अंदाजही लावला जात आहे की, भविष्यात माणूस मशिनचा गुलाम होऊ शकतो. हा धोका पाहता तंत्रज्ञानातील दिग्गज या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. दिग्गजांनी एक ओपन लेटर जारी केले असून, या लेटरवर इलॉन मस्क, अॅपलचे को-फाउंडर स्टीव्ह नोझनाईक यांच्यासह 1000 टेक दिग्गज आणि रिसर्चर्सनी स्वाक्षरी केली आहे.

लेटरमध्ये नेमकं काय?
'AI तंत्रज्ञान आता दैनंदिन कामात मानवाच्या बरोबरीला येत आहे. आपल्याला विचार करावा लागेल की, मशीनने आपल्याला कंट्रोल करण्याची परवानगी आपण द्यायची का? आपल्याला सर्व कामे ऑटोमेशनवर टाकायची आहे का? आपल्याला असे तंत्रज्ञान विकसित करायचे आहे का, जे आपली जागा घेईल?' असे या लेटरमध्ये म्हटले आहे.

 

Web Title: Shut down AI technology immediately; Elon Musk and co-founders of Apple demand, why..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.