स्मार्टफोनच्या किमतीत येतोय स्मार्ट टीव्ही....पाहा किती आहे किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 12:33 PM2018-10-01T12:33:33+5:302018-10-01T12:37:45+5:30
ही कंपनी टीव्हीच्या दुनियेतही हीच रणनीती अवलंबत आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्हीसारखे फिचर्स देत ती आता सॅमसंग, एलजी सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे.
नवी दिल्ली : चीनची मोबाईल कंपनी शाओमीनेभारतात चांगलेच पाय पसरविले आहेत. कमी किंमतीत जास्त फिचर्सवाले फोन बाजारात आणून कंपनीने भारतीयांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कंपनीने नुकताच Poco F1 हा कमी किंमतीतला परंतू फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. आता ही कंपनी टीव्हीच्या दुनियेतही हीच रणनीती अवलंबत आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्हीसारखे फिचर्स देत ती आता सॅमसंग, एलजी सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणार आहे.
Xiaomi या कंपनीने भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये टीव्ही आणला आहे. Mi TV 4A असे या टीव्हीचे नाव असून 32 इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये आयपीएस एलईडी पॅनल देण्यात आले आहे. तर स्क्रीन रिझॉल्युशन 1366*768 पिक्सल आहे आणि स्क्रीन अस्पेक्ट रेशो 16:9 आहे.
टीव्हीमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तर ARM CORTEX- A7 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. भारतातील लोक टीव्हीचा चांगला आवाज पसंत करतात. यामुळे या टीव्हीमध्ये 10 वॅटचे 2 ऑडियो स्पिकर देण्यात आले आहेत.
टीव्हीमध्ये वाय फाय सोबत लॅन कनेक्टिव्हिटी आणि वेब ब्राऊजिंग सोबत स्क्रीन कास्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या टीव्हीमध्ये अॅप आणि मुव्हीजही आरामात डाऊनलोड करता येणार आहेत.
या सर्व फिचरनी युक्त टीव्हीची किंमत एवघी 13,490 रुपये आहे. येत्या 10 दिवसांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मोठे सेल लागणार आहेत. म्हणजे हा टीव्ही आणखी स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.