उद्यापासून तीन व्हेरियंटमध्ये मिळणार ऑनरचा हा स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: July 30, 2018 02:45 PM2018-07-30T14:45:08+5:302018-07-30T14:45:18+5:30
हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्या ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर ९ एन हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्या ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर ९ एन हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ऑनर ९ एन हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ३जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज (मूल्य ११,९९९ रूपये); ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज (१३,९९९ रूपये) आणि ४ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज (१७,९९९ रूपये) अशा तीन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. या तिन्ही मॉडेल्समध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अतिशय वेगवान असा किरीन ६५९ हा प्रोसेसर दिलेला आहे. ३१ जुलैपासून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकणार आहे.
ऑनर ९ एन स्मार्टफोनमध्ये आयफोन-एक्स या मॉडेलप्रमाणे वरील बाजूस नॉच देण्यात आला आहे. यावर फ्रंट कॅमेरा, इयरपीस आणि सेन्सर्स देण्यात आलेले आहेत. हा डिस्प्ले एज-टू-एज या प्रकारातील असणार आहे. याचे आकारमान ५.८४ इंच व याचे अस्पेक्ट रेशो १९:९ असा आहे. हा फुल एचडी प्लस (१०८० बाय २२८० पिक्सल्स) क्षमतेचा असणार आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर तर पुढे फेस रिकग्नीशन प्रणाली प्रदान करण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असणार आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. याच्या रिअर आणि फ्रंट या दोन्ही कॅमेर्यांमध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेने सज्ज असणारे फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या मदतीने यात फेस ब्युटीसह विविध मोड दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियोवर आधारित इएमयुआर ८.० या प्रणालीवर चालणारे आहे.