स्मार्टफोनमुळे वाढले नवरा-बायकोतील अंतर; वैवाहिक नात्यांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:48 AM2022-12-14T05:48:34+5:302022-12-14T05:48:50+5:30
विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सतत फोनमध्ये डोके घालून राहिल्याने एकाच घरात राहूनही विवाहित जोडप्यांच्या संबंधांवर धक्कादायक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८८ टक्के विवाहित भारतीयांना असे वाटते की स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या नातेसंबंधांचे मोठे नुकसान झाले असून, नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे घरामध्ये स्मार्टफोनचा वापर धोकादायक ठरू लागला आहे.
विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले. यामध्ये दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील एक हजाराहून अधिक लोकांचा सहभाग होता.
नाते हवे, पण वेळ देऊ शकत नाही
लोकांचा विश्वास आहे की स्मार्टफोनऐवजी, आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवल्याने त्यांना आनंद मिळतो. परंतु तरीही ते कमी वेळ घालवतात. बहुतांश लोकांना यात बदल हवा आहे.
जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत
६७% लोकांनी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवताना फोनवर व्यस्त असल्याचे कबूल केले.
८९% लोकांनी कबूल केले की ते त्यांच्या जोडीदाराशी बोलण्यात कमी वेळ घालवत आहेत.
६६% लोक म्हणतात की, फोनमुळे जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत झाले आहे.
लोक म्हणतात की, आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आहे.
लोक मान्य करतात की, स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे त्यांचे जोडीदारासोबत असलेले संबंध अधिक ताणले गेले आहेत.
म्हणतात की, स्मार्टफोन त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.
लोक मान्य करतात की, ते स्मार्टफोनमध्ये इतके गुंग होऊन जातात की त्यांच्या आजूबाजूला काय घडतेय याचे त्यांना भान नसते.
लोक कुटुंबासोबत बसून चर्चा करण्याऐवजी फोनमध्ये गुंग राहतात.