देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:02 AM2022-08-26T07:02:22+5:302022-08-26T07:02:43+5:30

स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुट्या भागावरील सीमा शुल्क इनपुट्सच्या आधारावर अधिक प्रमाणात आकारण्यात येणार असल्याचा आदेश

Smartphones will be expensive again in the country customers are hit by the increase in customs duty | देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका 

देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका 

Next

नवी दिल्ली : 

स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुट्या भागावरील सीमा शुल्क इनपुट्सच्या आधारावर अधिक प्रमाणात आकारण्यात येणार असल्याचा आदेश केंद्रीय अप्रत्यक्ष व सीमा शुल्क बोर्डाने (सीबीआयसी) जारी केला आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढणार आहेत. 

बॅक सपोर्ट फ्रेमसह स्मार्ट डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवरील आधार सीमा शुल्क १० टक्क्यांनी वाढणार आहे. आता सुटे भाग डिस्प्ले असेंबलीसोबत आयात केल्यास आयात कर १५ टक्के होईल. आधी तो ५ टक्के होता. या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपन्या फोनच्या किमतींत १० ते १५ टक्के वाढ करू शकतात.

सीबीआयसीचे म्हणणे ?
डिस्प्ले असेंबलीच्या नावावर इतरही अनेक सुटे भाग आयात करून कर चोरी केली जाते.

सिम ट्रे, अँटेना पिन, स्पीकर नेट, पॉवर की, स्लाइडर स्विच, बॅटरी कम्पार्टमेंट, फ्लेक्झिबल प्रिंटेड सर्किट, सेंसर, स्पीकर, फिंगरप्रिंट इत्यादी सुटे भाग आयात केले गेल्यास पूर्ण असेंबलीवर १५ टक्के आधार सीमा शुल्क लावले जाईल.

उद्योगाचे म्हणणे काय?
स्मार्टफोन उत्पादक उद्योगाने या करवाढीस विरोध केला आहे. उद्योगाचे म्हणणे आहे की, मोबाइल फोनच्या डिस्प्लेसोबत जोडलेल्या सर्व सुट्या भागांना एकत्रितरित्या 'डिस्प्ले असेंबली' मानले जायला हवे. त्यानुसार, त्यावर केवळ १० टक्के आयात कर लागायला हवा.

विक्रीत आधीच घट
चीपच्या टंचाईमुळे रेडमी, ओप्पो, सॅमसंग यांसह अनेक प्रमुख मोबाइल फोन कंपन्यांनी फोनच्या किमती अलीकडेच वाढविल्या आहेत. सरासरी १,५०० रुपयांची दरवाढ कंपन्यांनी केली आहे. त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे. २००२२ च्या एप्रिल जूनच्या तिमाहीत भारतात स्मार्टफोनची विक्री ९ टक्क्यांनी वाढली. मात्र, विक्री ५ टक्क्यांनी घसरून ३.७ कोटी युनिट राहिली.

Web Title: Smartphones will be expensive again in the country customers are hit by the increase in customs duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.