'बाप्पा स्पेशल' ३ लेन्सेस, स्नॅपचॅट युजर्सना मिळेल सणासुदीचा 'लूक अँड फिल'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 03:04 PM2023-09-22T15:04:32+5:302023-09-22T15:04:55+5:30
खुशियाँ फाउंडेशनच्या मदतीने गणेश विसर्जनाबाबत पर्यावरणाप्रति जबाबदारी समजून घेण्यासाठी जनजागृती
गणेश चतुर्थीच्या अनोख्या अनुभवासाठी सज्ज व्हा! गणेशोत्सवानिमित्त स्नॅपचॅट तीन मजेदार AR लेन्स आणत आहे. यामुळे फेस्टिव्हलमध्ये एक छान 'टेक-ट्विस्ट' जोडला जाईल. मोदक रन लेन्स, बाप्पा आरती लेन्स आणि विसर्जन बीच केअर लेन्ससह या तीन लेन्समध्ये परंपरा आणि नावीन्य यांचा समावेश आहे. याच्यामुळे युजर्सना आनंदी पद्धतीने उत्सवात सामील होता येईल.
- स्नॅपचॅटच्या मोदक रन लेन्समुळे तुम्ही एका व्हर्च्युअल जगात प्रवेश करता. तेथे तुम्ही मूषकराजाला गणपतीसाठी मोदक गोळा करायला मदत करता. हा केवळ खेळ नसून यातून एका अर्थी मजेशीर प्रकारे गणपती बाप्पाची सेवात घडते.
- बाप्पाशी असलेलं नातं आणखी घट्टं करण्यासाठी स्नॅपचॅटची बाप्पा आरती लेन्स तुम्हाला नक्कीच मदत करेल. आरती लेन्सच्या सहाय्याने, तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर धरून बाप्पाला व्हर्च्युअल पद्धतीने नेवैद्य किंवा विविध वस्तू अर्पण करू शकता.
- तसेच, खुशियाँ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विसर्जन बीच केअर लेन्सदेखील युजर्सना देण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा याचा हेतु आहे. एका गेमच्या माध्यमातून ही लेन्स वापरता येणार असून हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्यांना 'बीच वॉरियर्स' हा बॅच मिळणार आहे.
स्नॅपचॅटमध्ये विसर्जन कालावधीत दादर, जुहू आणि वर्सोवा या प्रतिष्ठित समुद्रकिनाऱ्यांवर स्नॅपचॅटर्सद्वारे कॅप्चर केलेले टॉप स्नॅप्स दाखवले जातील. Snap Maps वरील या अनोख्या शोकेसचे उद्दिष्ट गणेश चतुर्थीचे चैतन्यपूर्ण चित्र कॅप्चर करणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना सामुहिक केलेले वैविध्यपूर्ण आणि मनमोहक क्षण हायलाइट करणे हा आहे.