लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच
By सिद्धेश जाधव | Published: April 23, 2022 12:03 PM2022-04-23T12:03:18+5:302022-04-23T12:03:27+5:30
Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Motorola नं Moto G Stylus नावाचा स्मार्टफोन सादर केला होता. या फोनची खासियत म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट सीरिजमध्ये मिळणाऱ्या एस पेन सारखा स्टायलस कंपनीनं स्वस्तात दिला होता. आता कंपनीनं अपग्रेडेड Moto G Stylus 5G (2022) लाँच केला आहे. ज्यात स्टायलस तर मिळतोच सोबत 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Moto G Stylus 5G (2022) चे स्पेसिफिकेशन्स
Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह विकत घेता येईल.
Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. यातील 5000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Moto G Stylus 5G (2022) ची किंमत
Moto G Stylus (2022) स्मार्टफोनचा एकाच व्हेरिएंट यूएसमध्ये सादर करण्यात आला आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या हँडसेटची किंमत 499.99 डॉलर (सुमारे 38,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. मोटोरोला का हा स्मार्टफोन अमेरिकेत 28 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.