स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात

By सिद्धेश जाधव | Published: April 27, 2022 11:51 AM2022-04-27T11:51:45+5:302022-04-27T11:51:55+5:30

POCO F4 GT स्मार्टफोनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 120W फास्ट चार्जिंग आणि 20MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Snapdragon 8 Gen 1 Featured POCO F4 GT launch price specifications  | स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात

स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात

googlenewsNext

POCO ची सुरुवात शाओमीचा सब-ब्रँड म्हणून झाली होती. परंतु हळू हा ब्रँड आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमध्ये पोकोचे अनेक हँडसेट लोकप्रिय आहेत. आता प्रीमियम सेगमेंटमध्ये देखील कंपनीनं POCO F4 GT स्मार्टफोन सादर केला आहे. यात गेमिंग फोनचे सर्व फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यात 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 120W फास्ट चार्जिंग आणि 20MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.  

POCO F4 GT ची किंमत 

POCO F4 GT स्मार्टफोन सध्या जागतिक बाजारात आला आहे. हा फोन फोन लवकरच भारतात Poco F3 GT ची जागा घेऊ शकतो. जागतिक बाजारात या डिवाइसच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 599 युरो (जवळपास 49,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल 699 युरो (जवळपास 57,200 रुपये) मध्ये विकत घेता येईल.  

Poco F4 GT चे स्पेसिफिकेशन्स  

या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश आणि 480Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतात. हा फोन डिस्प्लेमेट A+ रेटिंगसह येतो आणि सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी यातील 4700mAh ची बॅटरी वेगवान 120 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह मागे ट्रिपल सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 12 जीबी पर्यंतचा वेगवान LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये ड्यूल VC कूलिंग देण्यात आली आहे. 

गेमर्ससाठी खास या पोको फोनसोबत एक एल-आकाराची केबल देण्यात आली आहे. तसेच सॉफ्टवेयर कस्टमाइजेशन, लिक्विड कूल टेक्नॉलॉजी 3.0 आणि मॅग्नेटिक पॉप-अप शोल्डर बटन देखील गेमिंग सोपं करतात. हा फोन Stealth Black, Knight Silver आणि Cyber Yellow मध्ये विकत घेता येईल.  

Web Title: Snapdragon 8 Gen 1 Featured POCO F4 GT launch price specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.