सेनहैजरचे प्रिमीयम इयरफोन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 07:42 PM2018-05-16T19:42:07+5:302018-05-16T19:42:07+5:30
ध्वनी उपकरणांमधील ख्यातप्राप्त ब्रँड असणार्या सेनहैजरने भारतीय बाजारपेठेत मोमेंटम फ्री या नावाने नवीन ब्ल्यु-टुथ इयरफोन्स उपलब्ध केले आहेत
मुंबई - ध्वनी उपकरणांमधील ख्यातप्राप्त ब्रँड असणार्या सेनहैजरने भारतीय बाजारपेठेत मोमेंटम फ्री या नावाने नवीन ब्ल्यु-टुथ इयरफोन्स उपलब्ध केले आहेत.वास्तविक पाहता बाजारपेठेत अत्यंत किफायतशीर दरात हेडफोन्स वा इयरफोन्स उपलब्ध आहेत. मात्र सेनहैजर कंपनीने अतिशय उच्च श्रेणीतील मोमेंटम फ्री हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अर्थात यातील फिचर्सदेखील तितक्याच तोलामोलाचे आहेत. हे या कंपनीच्या मोमेंटम या मालिकेतील नवीन प्रॉडक्ट आहे. याचा लूक अतिशय आकर्षक असून याला मजबुतीदेखील प्रदान करण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस मॅग्नेट देण्यात आले आहे. यामुळे वापरात नसतांना ते एकमेकांना चिपकून राहतात. यामुळे अर्थातच युजर्सची सोय होणार असल्यामुळे हे फिचर उपयुक्त ठरणारे आहे. तसेच याला ठेवण्यासाठी अतिशय सुबक अशी लेदर बॅगदेखील देण्यात आली आहे.
सेनहैजरचे मोमेंटम फ्री हे इयरफोन्स युजरच्या स्मार्टफोनला ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येतात. यात इन-लाईन या प्रकारातील रिमोट कंट्रोल प्रदान करण्यात आला आहे. यात ध्वनी कमी-जास्त करण्यासह म्युझिकचा ट्रॅक बदलता येतो. तसेच यात असणार्या मायक्रोफोनच्या मदतीने याच्याशी संलग्न असणार्या स्मार्टफोनचे कॉल रिसिव्ह करणे शक्य आहे. यामुळे संगीत ऐकण्यासह स्मार्टफोन कॉलींगसाठीही याचा सुलभपण वापर करता येणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा एपीटीएक्स तसेच एएसी या कोडेक्सचाही सपोर्ट आहे. यामुळे यामध्ये या फॉर्मेटमधील ध्वनीही ऐकता येणार आहे. यामध्ये अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे सहा तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलचे मूल्य १४,९९० रूपये असून कंपनीच्या ई-स्टोअरवरून ( https://en-in.sennheiser.com/headphones-bluetooth-momentum-free ) याला उपलब्ध करण्यात आले आहे.