...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 10:08 IST2019-09-22T14:41:54+5:302019-09-23T10:08:30+5:30
टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे.

...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार
नवी दिल्ली: टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. देशात टेलीकॉम कनेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्यासाठी विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशभरात सध्या 7,8 आणि 9 या नंबरने मोबाईल क्रमांकाची सुरुवात होते. तसेच सध्या भारतात 120 कोटी टेलिफोन कनेक्शन असून 2050 वर्षापर्यत 260 कोटी नंबरची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रायला विविध पर्याय शोधायचे असून यामध्ये मोबाईल नंबरिंग सिस्टम बदलण्याचा पर्यायचा देखील समावेश आहे. त्यामुळे ट्रायकडून मोबाईल नंबरच्या डिजिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
याआधी देखील 1993 आणि 2003 मध्ये भारताने क्रमांक लागणार्या योजनांचा आढावा घेतला होता. ट्रायनुसार कनेक्शनच्या मागणीत होत असलेल्या वाढीमुळे नंबर रिसोर्सेजला धोका होण्याची संभावना आहे. त्यामुळे मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करुन सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच असे झाल्यास मोबाईलसोबत डोंगलच्या कनेक्शन नंबरही 13 डिजिटमध्ये होणार आहे.