आता पटकथा लिखाणासाठीही सॉफ्टवेअर !

By शेखर पाटील | Published: August 2, 2017 05:04 PM2017-08-02T17:04:27+5:302017-08-02T17:04:33+5:30

सिनेमा, नाटक, दूरचित्रवारी मालिका आदींच्या पटकथा लिखाणासाठी सॉफ्टवेअर असू शकेल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, यासाठी फायनल ड्राफ्ट १० हे सॉफ्टवेअर आता विकसित करण्यात आले आहे.

Software for writing script now! | आता पटकथा लिखाणासाठीही सॉफ्टवेअर !

आता पटकथा लिखाणासाठीही सॉफ्टवेअर !

Next

सॉफ्टवेअर आता तंत्रज्ञानातच वापरले जात नसून जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये याचा मुक्त वापर सुरू झाला असून याला नाटक/सिनेमाचाही अपवाद नाही. या क्षेत्राचा आत्मा म्हणजे पटकथा होय. कोणत्याही उत्तम कलाकृतीमध्ये चांगल्या दर्जाची पटकथा आवश्यक असते. यासाठी लेखक व त्यांच्या सहाय्यकांचा मोठा ताफा कार्यमग्न असतो. आता या सर्व प्रकाराला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. या अनुषंगाने सध्या हॉलिवुडसह जगभरातील चित्रपट निर्मिती आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी फायनल ड्राफ्ट १० या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात आहे. यामध्ये उत्तम दर्जाच्या पटकथा लिखाणासाठी आवश्यक असणारे सर्व फिचर्स आहेत. यामध्ये कोणत्याही कच्च्या कथानकाला हॉलिवुड स्टाईल पटकथानकात परिवर्तीत करण्याची सुविधा आहे. यात कोणत्याही लिखाणाच्या पेजीनेशन आणि व्याकरणात्मक चुका सुधारण्यापासून ते त्याला सृजनशील पध्दतीत सादर करण्याची सुविधा आहे. यामध्ये हॉलिवुडच्या १०० प्री-इन्टॉल्ड थीम्स आहेत. म्हणजे कुणाला गुन्हेगारीवर आधारित पटकथा लिहावयाची असल्यास यासाठीची कच्चा मसाला असणारी थीम यामध्ये असेल. यात आपण हव्या त्या पध्दतीने कथानक विकसित करून उत्तम पटकथा निर्मित करू शकतो. समजा एखाद्या पटकथेवर एकापेक्षा जास्त लेखक काम करत असतील तर त्यांचे काम अगदी रिअल टाईम पध्दतीने संलग्न करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. यात स्टोरी मॅप हे अभिनव फिचर असून याच्या मदतीने अत्यंत परिणामकारक संवाद, वेगवेगळी दृश्ये आदींमध्ये परिणामकारकता साधणे शक्य आहे.

फायनल ड्राफ्ट १० या सॉफ्टवेअरची मूळ किंमत २४९ डॉलर्स असली तरी सध्या ते सवलतीच्या दरात म्हणजेच १४९ डॉलर्सला उपलब्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच्या ताज्या आवृत्तीत काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात लेखकांच्या ताफ्याची जागा सॉफ्टवेअर्सचा कुशल वापर करणार्‍या तंत्रज्ञांनी घेतल्यास नवल वाटता कामा नये. 

पहा: फायनल ड्रॉफ्ट १० या पटकथा सॉफ्टवेअर्सच्या नवीन फिचर्सची माहिती देणारा व्हिडीओ.

Web Title: Software for writing script now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.