जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 08:23 PM2024-06-27T20:23:55+5:302024-06-27T20:24:36+5:30
Jio Recharge Plans Hike: जिओने ग्राहकांना मोठा धक्का दिला असून रिचार्ज प्लॅनच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. आधीच महागाईत होरपळणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.
Reliance Jio New Plans: काही वर्षांपूर्वी ४जी लाँच करून फुकटात अनलिमिटेड फास्ट इंटरनेट देणाऱ्या रिलायन्सजिओने आता ग्राहकांचा खिसा रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. आज जिओने ग्राहकांना मोठा धक्का दिला असून रिचार्ज प्लॅनच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. आधीच महागाईत होरपळणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.
जिओ (JIO) गेल्या दीड वर्षापासून ४जी च्या रिचार्जमध्येच ५जी अनलिमिटेड (Jio 5G Unlimited Plans) सेवा देत होते. यासाठी कमीतकमी २३९ रुपयांचा प्लॅन घ्यावा लागत होता. या प्लॅनसाठी आता जिओ ग्राहकांना २९९ रुपये मोजावे लागणार आहेत. परंतू नव्या अटीनुसार यात फाईव्हजी अनलिमिटेड मिळणार नाही. जिओने सर्वच प्लॅनच्या दरात वाढ केली असून ही वाढ २० ते २५ टक्के एवढी मोठी आहे.
जर ग्राहकांना अनलिमिटेड ५ जी वापरायचे असेल तर २ जीबी दिवसा इंटरनेट असलेल्या प्लॅनवरच मिळणार आहे. हे नवे दर ३ जुलैपासून लागू होणार आहेत. याचबरोबर जिओने जिओ सेफ हे कॉलिंग, मेसेजिंग आणि फाईल पाठविण्यासाठी अॅप सादर केले आहे. हे अॅप १९९ रुपयांवरच्या प्लॅन्सवर मोफत वापरता येणार आहे. तसेच जिओ ट्रान्सलेट देखील लाँच करण्यात आले आहे.
यामुळे जर जिओ ग्राहकांना जर जिओ ५ जी नेटवर्क अनलिमिटेड वापरायचे असेल तर कमीतकमी ३४९ रुपयांचे रिचार्ज मारावे लागणार आहे. २३९ रुपयांचे जे आता २९९ रुपयांना रिचार्ज झाले आहे, त्यात १.५ जीबी दर दिवसा डेटा दिला जात आहे. यामुळे तो जिओच्या २ जीबी प्रति दिवसाच्या अटीनुसार अनलिमिटेड ५ जी साठी पात्र असणार नाही.
जिओचे सर्वात की रिचार्ज हे १५५ होते ते आता १८९ रुपयांवर गेले आहे. यात २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह केवळ २ जीबी महिनाभरासाठी टेडा मिळणार आहे.
Reliance Jio introduces new unlimited 5G plans to be available from 3rd July pic.twitter.com/TsDMAG682r
— ANI (@ANI) June 27, 2024
असे आहेत नवे दर...
अनलिमिटेड ५ जी हवे असेल तर महिन्याला ३४९ च्या वरचे प्लॅन, दोन महिन्यासाठी ५३३ रुपयांचा प्लॅन, तीन महिन्यांसाठी ७१९, ९९९; वर्षभर व्हॅलिडिटीसाठी २९९९ रुपये मोजावे लागत होते ते आता ३५९९ रुपये लागणार आहेत. (Jio 5G Unlimited Plans Price Hike)