इंटरटेंमेंटचा बॉस आला! मिनी थिएटरचा अनुभव देतील डॉल्बी ऑडिओ असलेले Sony चे 4K Smart TV
By सिद्धेश जाधव | Published: May 3, 2022 12:09 PM2022-05-03T12:09:40+5:302022-05-03T12:09:51+5:30
सोनीनं भारतात आपले नवीन 4K Smart TV लाँच केले आहेत. या टीव्हीची किंमत 56 हजार रुपयांपासून सुरु होते.
Sony चे स्मार्टफोन असो, ऑडिओ डिवाइस असो किंवा Smart TV, हे सगळे प्रोडक्ट्स गुणवत्तेसाठी ओळखले जातात. त्यामुळे जेव्हा कंपनी नवीन डिवाइस सादर करते तेव्हा प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढते. आता Sony नं भारतात आपल्या Bravia X75K 4K ही Smart TV ची रेंज सादर केली आहे. या नवीन सीरीजमध्ये 43 इंच, 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचे चार मॉडेल सादर केले आहेत.
स्पेसिफिकेशन्स
हे टीव्ही प्रीमियम स्लिम बेजल डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. या सीरिजमध्ये 2160x3840 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 4K डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HDR10, लाईव्ह कलर टेक्नॉलजी आणि मोशनफ्लो XR ला सपोर्ट करतो. या फीचर्समुळे टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी शानदार होते. दमदार साउंडसाठी यात तुम्हाला डॉल्बी ऑडियोसह 10 वॉटचे स्पिकर्स देण्यात आले आहेत. सोबत शानदार लो-एन्ड साऊंडसाठी Bass Reflex फीचर देण्यात येईल.
सोनीचे हे टीव्ही अँड्रॉइड ओएसवर चालतात. यात स्मार्ट व्हॉइस कंट्रोल देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 4K प्रोसेसर X1 चिप मिळते. बिल्ट-इन क्रोमकास्ट फिचर फोन वर लॅपटॉपची स्क्रीन मिरर करण्यास मदत करतं. या नवीन टीव्हीमध्ये डिस्प्ले ऑफ मोड देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, तीन HDMI पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक RF पोर्ट आणि एक इथरनेट पोर्ट देण्यात आला आहे.
किंमत आणि उपलब्धता
सीरिजमधील 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 55,990 रुपये आणि 50 इंचाच्या मॉडेलची किंमत 66,990 रुपये आहे. 55 इंच आणि 65 इंचाच्या मॉडेल्सची किंमत कंपनीनं सांगितली नाही. हे सोनी सेंटर, ऑफलाईन स्टोर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून विकत घेता येतील.