थिएटरचा माहोल बनवा घरच्या घरी; शानदार डिस्प्ले आणि पावरफुल साउंडसह आला Sony चा नवीन TV
By सिद्धेश जाधव | Published: May 21, 2022 02:43 PM2022-05-21T14:43:38+5:302022-05-21T14:43:46+5:30
Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज अंतर्गत कंपनीनं 4K स्मार्ट टीव्हीचे पाच मॉडेल सादर केले आहेत.
Sony नं भारतात आपला स्मार्ट टीव्हीचा पोर्टफोलियो वाढवला आहे. Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज अंतर्गत 4K Smart TV चे पाच मॉडेल देशात आले आहेत. ज्यात 75-इंच, 65-इंच, 55-इंच, 50-इंच आणि 43-इंचाच्या टीव्हीजचा समावेश आहे. यातील 55-इंचाच्या मॉडेलची किंमत कंपनीनं सांगितली आहे. जो 94,990 रुपयांमध्ये सोनी सेंटर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोर आणि ई-कॉमर्स पोर्टलवरून विकत घेता येईल.
Sony Bravia X80K स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन
Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही लाइनअपमध्ये 4K LCD डिस्प्ले HDR10, डॉल्बी विजन आणि HLG फॉर्मेटसपोर्टसह सादर करण्यात आला आहे. यातील Triluminos Pro डिस्प्ले स्क्रीनवरील रंग वाढवतो. हा डिस्प्ले 50Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट. करतो कंपनीनं यात Sony 4K HDR प्रोसेसर X1 दिला आहे. सोबत 16GB इनबिल्ट स्टोरेज मिळते.
हा एक Google TV असल्यामुळे यावर गुगल प्ले स्टोरवरून अनेक अॅप्स डाउनलोड करता येतील. Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही मॉडेलमध्ये डॉल्बी ऑडियो, डॉल्बी अॅटमॉस, डीटीएस डिजिटल सराउंड आणि साउंड ऑटो-कॅलिब्रेशन असलेले दोन 10W स्पिकर देण्यात आला आहेत.
कनेक्टिव्हिटीसाठी , ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v4.2, चार एचडीएमआय पोर्ट, बिल्ट-इन क्रोमकास्ट, एक ऑडियो जॅक आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आला आहेत. रिमोट व्हॉइस कमांडला सपोर्ट करतो. स्मार्ट टीव्ही मॉडेलमध्ये देखली बिल्ट-इन मायक्रोफोन देण्यात आला आहे. हे स्मार्ट टीव्ही अॅप्पल एयरप्ले आणि होमकिटला सदेखील सपोर्ट करतात, त्यामुळे आयपॅड आणि आयफोन सारख्या अॅप्पल डिवाइसवरील कंटेंट स्ट्रीम करता येतो.