गर्मी होईल छूमंतर! T-Shirt वर चिटकवा तुमचा ‘पर्सनल’ AC, छोटा पॉकेट एसी देईल भन्नाट गारवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:40 AM2022-04-28T11:40:42+5:302022-04-28T11:40:48+5:30
Sony चा रियोन पॉकेट वियरेबल एयर कंडीशनर तुमच्या टी-शर्टवर चिटकून तुम्हाला थंड ठेवतो.
गर्मीवर बेस्ट उपाय म्हणजे एसी. परंतु एसीचा थंडावा फक्त बंदिस्थ जागेपुरता मर्यादित असतो. जर तुम्ही जास्त प्रवास करणारे असाल तर गर्मीपासून सहज सुटका होत नाही. शरीराचं वाढलेलं तापमान तुमच्या आरोग्यसाठी घातक ठरू शकतं. यावर उपाय म्हणून Sony चं एक भन्नाट डिवाइस बाजारात उपलब्ध आहे. कंपनीनं क्राउडफंडिंगच्या माध्यमातून रियोन पॉकेट वियरेबल एयर कंडीशनर लाँच केला होता.
Sony Reon Pocket 2
Reon Pocket 2 मध्ये एक मेटल प्लेट दिली जाते जी तुम्हाला तुमच्या शरीराला स्पर्श करेल अशी सेट करायची असते. यात एक पावर ऑन ऑफ बटन देण्यात आलं आहे, ज्यात एक एलईडी इंडिकेटर मिळतो. डिवाइसच्या फ्रंटला गरम हवा बाहेर काढण्यासाठी वेन्ट देण्यात आले आहेत. तसेच हा एसी यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज करता येतो.
लेटेस्ट मॉडेलच्या स्वेट-प्रूफिंगमध्ये कंपनीनं सुधारणा केली आहे. त्यामुळे लाईट एक्सरसाईज करताना या डिवाइसचा चांगला उपयोग करता येतो. हा डिवाइस पूर्णपणे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित नाही. थंडावा देण्यासाठी कंपनीनं SUS316L स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे. बाहेर पडण्यापूर्वी Reon Pocket 2 तुम्ही टी-शर्ट किंवा शर्टवर चिटकवून ऑन करावा लागेल. त्यानंतर हा डिवाइस जबरदस्त कूलिंग देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. जापानमध्ये हा पर्सनल एसी 14,850 येन (सुमारे 10,592 रुपये) मध्ये विकला जात आहे.