सोनी स्मार्ट स्पीकर देणार गुगल, अ‍ॅपल अमेझॉनला आव्हान !

By शेखर पाटील | Published: September 1, 2017 06:36 PM2017-09-01T18:36:38+5:302017-09-01T22:02:43+5:30

सोनी कंपनीनेही स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातून डिजीटल असिस्टंट लाँच केला असून या माध्यमातून या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या गुगल, अ‍ॅपल आणि अमेझॉनला टक्कर देण्याचे संकेत दिले आहेत.

Sony smart speaker to challenge Google, Apple and Amazon | सोनी स्मार्ट स्पीकर देणार गुगल, अ‍ॅपल अमेझॉनला आव्हान !

सोनी स्मार्ट स्पीकर देणार गुगल, अ‍ॅपल अमेझॉनला आव्हान !

सोनी कंपनीनेही स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातून डिजीटल असिस्टंट लाँच केला असून या माध्यमातून या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या गुगल, अ‍ॅपल आणि अमेझॉनला टक्कर देण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सोनी कंपनीदेखील स्मार्ट डिजीटल असिस्टंट सादर करणार असल्याचे संकेत दिले होते. या अनुषंगाने बर्लीन शहरात सुरू झालेल्या आयएफए-२०१७ या प्रदर्शनात सोनी एलएफएस५०जी हा स्मार्ट स्पीकररूपी डिजीटल असिस्टंट सादर करण्यात आला आहे. अर्थात यासाठी सोनी कंपनीने गुगल असिस्टंटचा वापर केला आहे. म्हणजेच युजरला ओके गुगल या शब्दाने या स्पीकरला आज्ञा द्यावी लागणार आहे. गुगलने अलीकडेच आपला असिस्टंट थर्ड पार्टीजसाठी खुला करण्याची घोषणा दिली होती. यानंतर यावरच आधारित सोनी स्मार्ट स्पीकर लाँच करण्यात आलाय.
सोनी स्मार्ट स्पीकर हा युजरचा डिजीटल असिस्टंट म्हणून काम करण्यास सक्षम आहे. वर नमूद केल्यानुसार कुणीही ओके गुगल म्हणून त्याला ध्वनी आज्ञावली देऊ शकतो. याच्या मदतीने कुणीही हवामानाबद्दलचे अपडेट, विविध नोटिफिकेशन्स, एसएमएस आदी मिळवू शकतात. याच्या मदतीने कुणीही आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे स्मार्टफोनसह घरातील अन्य स्मार्ट उपकरणे याला संलग्न करण्याची सुविधा आहे. आणि अर्थात या सर्व उपकरणांचे फंक्शन्स व्हाईस कमांडच्या मदतीने करणे शक्य होणार आहे. यात वाय-फाय, एनएफसी आणि ब्ल्यू-टुथ कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर एका अ‍ॅपच्या मदतीने हा स्मार्ट असिस्टंट अन्य उपकरणांशी कनेक्ट करता येणार आहे. यात गुगलचे क्रोमकास्ट उपकरण इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यामुळे कुणीही आपल्या स्मार्टफोनवरील संगीताचा यावर आनंद घेऊ शकेल.
सोनी स्मार्ट स्पीकर या मॉडेलमध्ये ३६० अंशातील ध्वनी यंत्रणा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने सर्व दिशांना एकाच क्षमतेच्या ध्वनीचे प्रक्षेपण करता येणार आहे. तर युजर्सच्या व्हाईस कमांडला नीट समजून घेण्यासाठी यात अतिशय संवेदनशील असे मायक्रोफोन प्रदान करण्यात आले आहेत. यातील अन्य फिचर्स सोनी कंपनीने जाहीर केलेले नाहीत. मात्र पुढील महिन्यात हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत सुमारे २०० डॉलर्सच्या आसपासच्या मूल्यात लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. सध्या डिजीटल स्मार्ट स्पीकर असिस्टंटमध्ये गुगल होम आणि अमेझॉनचा इको हे मॉडेल्स आघाडीवर आहेत. तर अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वीच होमपॉडच्या माध्यमातून या क्षेत्रात पदार्पणाचे संकेत दिले आहेत. यातच आता सोनी एलएफएस५०जी या स्मार्ट स्पीकरची झालेली एंट्री लक्षणीय मानली जात आहे. या माध्यमातून सोनी कंपनी गुगल, अमेझॉन आणि अ‍ॅपलला आव्हान देणार असून एकंदरीतच डिजीटल स्मार्ट असिस्टंटच्या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.

Web Title: Sony smart speaker to challenge Google, Apple and Amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.