एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत 

By सिद्धेश जाधव | Published: April 23, 2022 03:31 PM2022-04-23T15:31:35+5:302022-04-23T15:32:29+5:30

सध्या बाजारतात WH-1000XM4 आणि WF-1000XM4 हेडफोन्स उपलब्ध आहेत. आता आगामी Sony WH-1000XM5 ची माहिती येऊ लागली आहे.  

Sony WH 1000XM5 Headphones Image Leak Ahead Of Launch   | एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत 

एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत 

googlenewsNext

Sony च्या ऑडिओ प्रोडक्ट्सचं कौतुक त्यांच्या युजर्स कडून केलं जातं. कंपनीची फ्लॅगशिप 1000XM सीरिज देखील खूप लोकप्रिय आहे. किंमत जास्त असली तरी गुणवत्तेसाठी या हेडफोन्स आणि इयरफोन्सची निवड केली जाते. सध्या बाजारतात WH-1000XM4 आणि WF-1000XM4 हेडफोन्स उपलब्ध आहेत. आता आगामी Sony WH-1000XM5 ची माहिती येऊ लागली आहे.  

TechnikNews नावाच्या टेक वेबसाईट्सनं WH-1000XM5 हेडफोन्सचा एक फोटो लीक केला आहे. या फोटोमधून या हेडफोन्सचा फर्स्ट लुक समो आला आहार. लीक फोटोमध्ये आगामी सोनी हेडफोन्सचे दोन कलर व्हेरिएंट दिसत आहेत. हे ऑडिओ प्रोडक्ट प्रीमियम डिजाईनसह बाजारात येऊ शकतात. याआधी देखील या हेडफोन्सचे काही फीचर्स लीक झाले आहेत.  

Sony WH-1000XM5 

आगामी 1000XM5 ची डिजाइन 1000XM3 सारखी दिसत आहे. यावेळी मोठे इयर पॅड्स दिले जाऊ शकतात. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी) मध्ये बदल होऊ शकतो. ऑन/ऑफ स्विचसाठी स्लायडर डिजाइन देण्यात आली आहे. तर कस्टम बटन आता एनसी/एम्बिएंट म्हणून येईल. हे हेडफोन्स ब्लॅक आणि सिल्वर मध्ये उपलब्ध होतील. 

Sony WH-1000XM5 चे लीक स्पेक्स 

Sony WH-1000XM5 हेडफोन ANC सह 40 तासांचा बॅटरी लाईफ देऊ शकतात. त्यामुळे एएनसीविना जास्त बॅटरी लाईफ मिळण्याची शक्यता आहे. या हेडफोन्सना फुल चार्ज होण्यासाठी 3.5 तास लागू शकतात. WH-1000XM5 मध्ये सुधारित ANC फिचर मिळू शकतं. नॉइज कॅन्सलेशनसाठी तीन मायक्रोफोन आणि दोन डेडिकेटेड चिप मिळतील. सोबत ब्लूटूथ v5.2, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB-C पोर्ट देखील मिळू शकतो. लवकरच Sony WH-1000XM5 हेडफोन बाजारात येतील.  

 

Web Title: Sony WH 1000XM5 Headphones Image Leak Ahead Of Launch  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.