3 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तास म्युजिक टाइम; आले Sony चे फाडू हेडफोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:01 PM2022-05-14T13:01:54+5:302022-05-14T13:02:33+5:30

Sony WH-1000XM5 वायरलेस हेडफोन बाजारात आले आहेत. जे सिंगल चार्जवर 30 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात.  

Sony WH1000XM5 Wireless Noise Cancelling Headphones Launched Check Price   | 3 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तास म्युजिक टाइम; आले Sony चे फाडू हेडफोन 

3 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तास म्युजिक टाइम; आले Sony चे फाडू हेडफोन 

Next

Sony आपल्या ऑडिओ प्रोडक्ट्सच्या गुणवत्तेसाठी ओळखली जाते. आता कंपनीनं वायरलेस हेडफोन्स शोधणाऱ्या लोकांसाठी नवा पर्याय Sony WH-1000XM5 वायरलेस नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सच्या स्वरूपात सादर केला आहे. सध्या यूएस आणि यूकेमध्ये सादर करण्यात आलेले हे फ्लॅगशिप हेडफोन 30 तासांची बॅटरी लाईफ देतात. तसेच यातील क्विक चार्जिंग फीचरच्या मदतीनं 3 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 3 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो.  

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Sony WH-1000XM5 चं वजन कमी ठेवण्यात आलं आहे. कानांवर कमी दबाव पडावा म्हणून नवीन सॉफ्ट फिट लेदरचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 30 मिमी ड्रायव्हर यूनिटचा वापर केला आहे, ज्यात सॉफ्ट टीपीयू (थर्मोप्लास्टिक पॉलीयूरेथेन) एज आहे, जो नॉइज कमी करतो. हे हेडफोन्स रियल टाइममध्ये कंप्रेस डिजिटल म्युजिक फाईल्स अपस्केल करण्यासाठी DSEE एक्सट्रीमसह Edge-AI चा वापर करतात.  

या हेडफोनमधील एकूण आठ मायक्रोफोन कंट्रोल करण्यासाठी एचडी नॉइज कॅन्सलिंग प्रोसेसर QN1 सह इंटीग्रेटेड प्रोसेसर V1 देण्यात आला आहे. यातील नवीन ऑटो एनसी ऑप्टिमायजर फीचर आजूबाजूची स्थिती आणि परिसरानुसार नॉइज कॅन्सलेशन आपोआप ऑप्टिमाइज करतो. हेडफोन्समध्ये स्पीक-टू-चॅट, अ‍ॅम्बिएंट साउंड, व्हॉइस असिस्टंट सपोर्ट आणि टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत.  

कनेक्टिव्हिटीसाठी, Sony WH-1000XM5 हेडफोन ब्लूटूथ v5.2 सह येतात. एकाच वेळी दोन डिवाइसशी कनेक्ट देखील करता येतं. तसेच हे वायर्ड मोडमध्ये देखील वापरता येतात. हे हेडफोन अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन ऑफ असल्यास 30 तास तर एएनसी ऑन केल्यावर 24 तास बॅटरी लाईफ देतात. हे हेडफोन 3 मिनिटांच्या क्विक चार्जिंगनंतर 3 तासांचा रन टाइम देतात.  

किंमत  

Sony WH-1000XM5 वायरलेस नॉइज कॅन्सलिंग हेडफोनची किंमत यूएसमध्ये 399 डॉलर्स (जवळपास 30,850 रुपये) आहे. यूकेमध्ये यांची किंमत जास्त म्हणजे 379 जीबीपी (जवळपास 35,800 रुपये) आहे. या हेडफोन्सच्या भारतीय लाँचची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.   

Web Title: Sony WH1000XM5 Wireless Noise Cancelling Headphones Launched Check Price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.