DSLR च्या तोडीची कॅमेरा सिस्टम; आयफोन-सॅमसंग देखील हादरले, Sony चे दोन दमदार फोन बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: May 11, 2022 05:41 PM2022-05-11T17:41:53+5:302022-05-11T17:42:17+5:30
Sony Xperia 1 IV आणि Sony Xperia 10 IV हे दोन दमदार स्मार्टफोन कंपनीनं सादर केले आहेत.
Sony Xperia 1 IV आणि Sony Xperia 10 IV हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच झाले आहेत. कंपनीच्या खासियत प्रमाणे यात देखील कॅमेरा सिस्टमवर जास्त काम करण्यात आलं आहे. Sony Xperia 1 IV एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, तर Sony Xperia 10 IV मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
Sony Xperia 1 IV चे स्पेसिफिकेशन्स
यात 6.5 इंचाचा 4K HDR OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे, त्याचबरोबर 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. सोनीचा हा फ्लॅगशिप फोन Android 12 वर चालतो. यातील 5,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन IP65/68 रेटिंगसह येतो, त्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो.
फोटोग्राफीसाठी Sony Xperia 1 IV मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 12MP चे तीन सेन्सर्स आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. सर्व कॅमेरा सेन्सर OIS ला सपोर्ट करतात. कॅमेरा सेंट्रिक फोनमध्ये त्यानुसार दमदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
Sony Xperia 10 IV चे स्पेसिफिकेशन्स
फोटोग्राफीसाठी Sony Xperia 10 IV मध्ये देखील मागे तीन कॅमेरे मिळतात. ज्यात 12MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 8MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा मिळतो. फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
यात 6 इंचाचा Full HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला Corning Gorilla Glass Victus ची सुरक्षा मिळते. हा फोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरसह येतो, सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB ची स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.
Sony Xperia 1 IV आणि Sony Xperia 10 IV ची किंमत
Sony Xperia 1 IV ची युरोपमध्ये किंमत 1,400 युरो (जवळपास 1,23,479 रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्या प्रीबुकिंगसाठी आलेला हा डिवाइस सप्टेंबर 2022 पासून विकत घेता येईल. Sony Xperia 10 IV ची किंमत 499 युरो (जवळपास 40,690 रुपये) ठेवण्यात आली आहे, जो पुढील महिन्यापासून विकत घेता येईल.