एकच नंबर! 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह 12GB RAM असलेला धमाकेदार Sony Xperia Pro-I लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 03:16 PM2021-10-26T15:16:20+5:302021-10-26T15:16:51+5:30

Sony Xperia Pro-I Price Specification And Details: Sony Xperia Pro-I हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन फेज डिटेक्शन ऑटोफोकस 1 इंचाच्या Exmor RS CMOS सेन्सरसह सादर करण्यात आला आहे.  

Sony xperia pro I launch specifications features 12gb ram vlog monitor zeiss tessar 1 inch cmos sensor know price and specifiaction  | एकच नंबर! 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह 12GB RAM असलेला धमाकेदार Sony Xperia Pro-I लाँच 

एकच नंबर! 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह 12GB RAM असलेला धमाकेदार Sony Xperia Pro-I लाँच 

googlenewsNext

युट्युबनंतर फेसबुक, इंस्टाग्रामसह इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी व्हिडीओ कन्टेन्टवर जास्त भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवर क्रिएटर्सची संख्या वाढली आहे. अशा व्हिडीओ क्रिएटर्ससाठी सोनीने एक नवीन फ्लॅगशिप फोन सादर केला आहे. कंपनीने Sony Xperia Pro-I स्मार्टफोन फेज डिटेक्शन ऑटोफोकस असलेल्या 1 इंचाच्या Exmor RS CMOS सेन्सरसह सादर केला आहे. त्याचबरोबर कंपनीने Vlog Monitor देखील सादर केला आहे.  

Sony Xperia Pro-I price 

Sony Xperia Pro-I ची किंमत 1,799.99 डॉलर (सुमारे 1,35,000 रूपये) आहे. तर Sony Vlog Monitor ची किंमत 199.99 डॉलर (सुमारे 14,900 रुपये) आहे. हे दोन्ही प्रोडक्ट डिसेंबरमध्ये खरेदी करता येतील.  

Sony Xperia Pro-I चे स्पेसिफिकेशन्स 

Sony Xperia Pro-I खासियत म्हणजे यातील कॅमेरा सेगमेंट. या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य 12 मेगापिक्सलचा 1-इंच टाइप Exmor RS सेन्सर आहे, हा सेन्सर दोन अपर्चर्सना सपोर्ट करतो. त्याचबरोबर 12-मेगापिक्सलचा 1/2.9-इंचाचा Exmor RS सेन्सर आणि 12-मेगापिक्सल 1/2.5-इंचाचा Exmor RS सेन्सर आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा 1/4-इंच सेन्सर देण्यात आला आहे. 

या कॅमेरा सेटअपच्या मदतीने हा सोनी एक्सपीरिया स्मार्टफोन 4K रिजॉल्यूशन आणि 120 फ्रेम प्रति सेकंदसह 21:9 व्हिडीओ फॉर्मेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी यात Cinematography Pro mode आणि इतर विविध सेटिंग्स देण्यात आल्या आहेत. कंपनीने सादर केलेला व्लॉग मॉनिटर फोनच्या मागे सेकंडरी डिस्प्ले म्हणून वापरता येतो. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोन काय रेकॉर्ड करताय हे तुम्हाला दिसेल. 

या कॅमेरा सेटअपला साजेसा डिस्प्ले देखील कंपनीने दिला आहे. या पॉवरफुल फोनमध्ये 6.5 इंचाचा 4K HDR (3,840x1,644 पिक्सल) ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 21:9 अस्पेक्ट रेशियो आणि 100 टक्के DCI-P3 कलर गमुटला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंटला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विकटसची तर बॅक पॅनलला गोरिल्ला ग्लास 6 ची सुरक्षा देण्यात आली आहे.  

प्रोसेसिंग पॉवरच्या बाबतीत देखील Sony Xperia Pro-I निराश करत नाही. या फोनमध्ये क्वालकॉमचा शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 12GB RAM आणि 512 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज कमी पडल्यास तुम्ही 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर देखील करू शकता. हा सोनी फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.  

इतर फीचर्स पाहता यात डॉल्बी अ‍ॅटॉमससह बिल्ट-इन स्पिकर देण्यात आले आहेत. हा एक ड्युअल सिम फोन आहे. ज्यात कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6, ड्युअल-बँड वाय-फाय सह 2.4GHz आणि 5GHz बँड, ब्लूटूथ 5.2, एनएफसीआणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असे ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर हा फोन A-GPS, A-GLONASS, Beidou, Galileo, QZSS आणि एक फिंगरप्रिंट सेन्सरसह दाखल झाला आहे. हा एक IPX5 आणि IPX8 वॉटर रेजिस्टंट आणि IP6X डस्ट रेजिस्टंट डिवाइस आहे. फोनमधील बॅटरी 4500mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Sony xperia pro I launch specifications features 12gb ram vlog monitor zeiss tessar 1 inch cmos sensor know price and specifiaction 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.