सोनी एक्सपेरिया एक्सए २ प्लस दाखल, जाणून घ्या फिचर्स
By शेखर पाटील | Published: August 27, 2018 04:47 PM2018-08-27T16:47:00+5:302018-08-27T16:47:34+5:30
सोनी कंपनीने जागतिक बाजारपेठेत एक्सपेरिया एक्सए २ प्लस हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.
सोनी कंपनीने जागतिक बाजारपेठेत एक्सपेरिया एक्सए २ प्लस हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.
सोनी कंपनीने आधी सादर केलेल्या एक्सए २ या स्मार्टफोनची पुढील आवृत्ती एक्सपेरिया एक्सए २ प्लस या मॉडेलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. यातही आधीच्या मॉडेलप्रमाणे अतिशय उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात दर्जेदार डिस्प्ले, उत्तम कॅमेरा आदींचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले १८:५ अस्पेक्ट रेशोयुक्त असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सए २ प्लस या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल नव्हे तर सिंगल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यात २३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स (एआय) अर्थात कृत्रीम बुध्दीमत्तेचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. हा कॅमेरा ५२ स्मार्ट सीन्सचा ओळखू शकतो. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून यात एफ/२.४ अपर्चर दिलेले आहे. क्वालकॉमच्या क्विकचार्ज ३.० या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ३,८५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.० या प्रणालीवर चालणारी आहे. हा स्मार्टफोन पहिल्यांदा तैवानमध्ये उपलब्ध करण्यात आला असून लवकरच याला भारतात लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.