सोनी एक्सपेरिया एक्सझेड १ भारतात सादर
By शेखर पाटील | Published: September 25, 2017 02:34 PM2017-09-25T14:34:58+5:302017-09-25T16:06:26+5:30
सोनी कंपनीने आपले एक्सपेरिया एक्सझेड १ हे फ्लॅगशीप मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी ४४,९९० रूपये मुल्यात लाँच करण्याची घोषणा केली असून याची नोंदणी सुरू झाली आहे. सोनी कंपनीने अलीकडेच बर्लीन शहरात झालेल्या ‘आयएफए’मध्ये एक्सपेरिया एक्सझेड१ या मॉडेलचे अनावरण केले होते
सोनी कंपनीने आपले एक्सपेरिया एक्सझेड १ हे फ्लॅगशीप मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी ४४,९९० रूपये मुल्यात लाँच करण्याची घोषणा केली असून याची नोंदणी सुरू झाली आहे. सोनी कंपनीने अलीकडेच बर्लीन शहरात झालेल्या ‘आयएफए’मध्ये एक्सपेरिया एक्सझेड१ या मॉडेलचे अनावरण केले होते. तेव्हापासूनच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत केव्हा येणार? याबाबत उत्सुकतेचा वातावरण निर्मित झाले होते. या पार्श्वभूमिवर आज सोनी कंपनीने भारतीय ग्राहकांना हे मॉडेल उपलब्ध केले आहे. आजपासूनच ग्राहकांना हे मॉडेल उपलब्ध करण्यात येणार आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेड १ या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यात ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा एचडीआर ट्रायल्युमिनस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले डस्ट व वॉटरप्रुफ असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५चे संरक्षक आवरण असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा वेगवान प्रोसेसर असून याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात १९ मेगापिक्सल्स क्षमतेचा मोशन आय कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात फोर-के क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींग शक्य आहे. याच्या कॅमेर्यात थ्री-डी क्रियेटर हे विशेष फिचर असून याच्या मदतीने थ्री-डी स्कॅन करून थ्री-डी प्रिंट काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फेस, हेड, फ्रि फॉर्म आणि फुड असे चार ‘मोड’ असून या त्रिमीतीय प्रतिमा सोशल मीडियातदेखील शेअर करता येणार आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेड १ हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.० ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असेल. क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानासह यात २,७०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असेल. अन्य फिचर्समध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी टाईप-सी आदींचा समावेश असेल.
सोनी एक्सपेरिया एक्सझेड १ या मॉडेलमध्ये ध्वनीच्या उत्तम अनुभुतीसाठी हाय रेझोल्युशन ऑडिओची व्यवस्था देण्यात आली आहे. याला डिजीटल नॉईन कॅन्सलेशन, एस-फोर्स सराऊंड साऊंड, स्टीरिओ रेकॉर्डींग आणि क्वॉलकॉमच्या एपीटीएक्स ऑडिओ सॉफ्टवेअरची जोड असेल.