व्हॉट्सअॅपचे कॉम्प्युटरसाठीही स्पेशल अॅप; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:07 PM2018-10-08T15:07:58+5:302018-10-08T15:08:58+5:30
व्हॉट्सअॅपने कॉम्प्युटरवरही विशेष अॅप सुरु केले असून विंडोज आणि अॅपलच्या मॅक ओएसवर हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे.
मोबाईलवर धुमाकूळ घातल्यानंतर व्हॉट्सअॅपने कॉम्प्युटरवरही विशेष अॅप सुरु केले असून विंडोज आणि अॅपलच्या मॅक ओएसवर हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. याआधी ते ब्राऊजरवर वापरता येत होते.
कॉम्प्युटरवर व्हॉट्स अॅप डाऊनलोड करण्यासाठी ब्राऊजरवरून व्हॉट्स अॅपच्या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तेथून तुमच्या विंडोज किंवा मॅक ओएस नुसार सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागले. यासाठी मात्र, विंडोजची 8 किंवा त्यापेक्षा जास्तीचे व्हर्जन असलेली आणि मॅक ओएसची 10.9 किंवा त्यापेक्षा वरचे व्हर्जन असलेली ऑपरेटिंग सिस्टिम असावी लागणार आहे. अन्य ऑपरेटिंग सिस्टमसाठी मात्र नेहमीचाच ब्राऊजर वापरावा लागणार आहे.
विंडोजसाठी असे करा डाऊनलोड
कॉम्प्युटरवरील ब्राऊजरवरून व्हॉट्स अॅपची .exe फाईल डाऊनलोड करावी. ती इन्स्टॉल झाल्यानंतर क्यु आर कोडद्वारे लॉग इन करता येणार आहे.