Spotify ने सादर केले Greenroom अॅप; क्लबहाऊसला देईल टक्कर हे ऑडिओ सोशल मीडिया अॅप
By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2021 02:42 PM2021-06-17T14:42:37+5:302021-06-17T14:43:42+5:30
Spotify Greenroom launch: स्पॉटीफाय ग्रीनरूम अँड्रॉइड आणि आयओएसवर जगभरातील 135 बाजारांमध्ये उपलब्ध झाले आहे.
Spotify या ऑडिओ स्ट्रीमिंग कंपनीने ग्रीनरूम नावाचे अॅप्लिकेशन लाँच केले आहे. या स्वीडिश कंपनीने सादर केलेले हे अॅप क्लबहाऊस अॅपला चांगलीच टक्कर देईल. ग्रीनरूममध्ये तुम्ही लाईव्ह चर्चा सुरु करू शकता किंवा सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होऊ शकता. (Spotify launches audio-based social app Greenroom)
स्पॉटीफाय ‘बेटी लॅब्स’ नावाची कंपनी विकत घेतली, या कंपनीने खेळ विश्वाशी निगडित ‘लॉकर रूम’ या अॅपची निर्मिती केली होती. हि कंपनी विकत घेतल्यानंतर स्पॉटीफायने ग्रीनरूम सादर केले आहे. लोकांच्या म्युजिक, पॉडकास्ट अश्या गरजा भागवत असल्यामुळे कंपनीकडे श्रोत्यांची कमतरता नाही. कंपनीने हे अॅप जगभरातील 135 बाजारांमध्ये सादर केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स हे अॅप वापरू शकतील.
ऑडिओ आधारित सोशल मीडिया श्रेणीत क्लबहाऊस गेल्या एक वर्षापासून आघाडीवर आहे. यात ट्विटरच्या स्पेसेसची भर पडली आहे आणि फेसबुक देखील लाईव्ह ऑडिओ रूम्स होस्ट करत आहे. या सर्व कंपन्यांच्याआधी डिस्कॉर्डने ऑडिओ आधारित सोशल मीडियाची सुरुवात केली होती, परंतु डिस्कॉर्ड व्हिडीओ गेम आधारित आहे.