Android युजर्ससाठी धोक्याची घंटा? Spyhide मालवेअर चोरतोय पर्सनल डेटा; आजच करा डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:30 PM2023-08-03T13:30:29+5:302023-08-03T13:31:03+5:30
स्पायहाइड मालवेअर युजर्सचे फोन कॉन्टॅक्ट, मेसेज, फोटो, कॉल लॉग्स, रेकॉर्डिंग आणि लोकेशन डेटाचे रिअल-टाइम तपशील सतत अपलोड करतं.
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये नेहमीच व्हायरसचा धोका असतो. अँड्रॉइड फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर आढळून आल्याचं समोर आलं आहे. ते य़ुजर्सचा डेटा चोरतात आणि नंतर डार्क वेबवर विकतात. असाच एक नवीन अँड्रॉइड स्पायवेअर दिसला आहे जे 2016 पासून App मध्ये आहे. हा स्मार्टफोनमध्ये असतो आणि युजर्सना माहितही नसतं. हा मालवेअर Spyhide चा चेहरा घेऊन स्वतःला लपवतो. हे इराणने विकसित केलेले सर्व्हिलान्स App आहे. हे जगभरातील युजर्सचा खाजगी डेटा जमा करतं.
stalkerware असं या सर्व्हिलान्स App चं नाव आहे. ते युजर्सच्या फोनमध्ये प्लांट केलं जातं. हे फोनच्या होम स्क्रीनवर उपस्थित आहे परंतु युजर्स ते डिटेक्ट करू शकत नाहीत. स्पायहाइड मालवेअर युजर्सचे फोन कॉन्टॅक्ट, मेसेज, फोटो, कॉल लॉग्स, रेकॉर्डिंग आणि लोकेशन डेटाचे रिअल-टाइम तपशील सतत अपलोड करतं.
एका रिपोर्टनुसार, Spyhide 2016 पासून युजर्सचा डेटा चोरत आहे. गोळा केलेल्या डेटामध्ये फोटो किंवा व्हिडीओ कधी घेतला आणि अपलोड केला गेला याची माहिती समाविष्ट आहे. SpyHide द्वारे गोळा केलेल्या डेटामध्ये 3.29 मिलियन टेस्ट मेसेजचा समावेश आहे. या मेसेजमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि पासवर्ड रीसेट लिंक समाविष्ट आहे. 1.2 मिलियन कॉल लॉग, अंदाजे 312000 कॉल रेकॉर्डिंग फाइल्स, 925000 हून अधिक कॉन्टॅक्ट लिस्ट आणि 382000 फोटो आहेत. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की त्यात 7,50,000 युजर्सचे रेकॉर्ड देखील आहेत ज्यांनी App साठी साइन अप केले आहे.
अँड्रॉईड फोनमध्ये हे App शोधणं कठीण होतं. रिपोर्टमध्ये असं म्हटले आहे की स्पायहाइड स्वतःला कॉग आयकॉनसह Google सेटिंग्ज किंवा म्युझिकल नोट आयकॉनसह T.Ringtone नावाचे रिंगटोन App म्हणून बदलते. युजर्स Apps ची लिस्ट पाहू शकतात ज्यांना डिव्हाइसच्या डेटामध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. यासाठी सेटिंग्ज मेनूमध्ये जाऊन App लिस्ट ओपन करा. Apps वर खाली स्क्रोल करा आणि तुम्ही डाउनलोड केलेले तुम्हाला माहीत नसलेले कोणतेही App त्वरीत अनइन्स्टॉल करा.