'वन प्लस ५ टी'ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन

By शेखर पाटील | Published: December 4, 2017 12:35 PM2017-12-04T12:35:21+5:302017-12-04T12:36:10+5:30

अलीकडेच बाजारपेठेत सादर करण्यात आलेल्या वन प्लस ५ या स्मार्टफोनची आता स्टार वॉर्स या नावाने मर्यादीत आवृत्ती घोषीत करण्यात आली आहे.

Star Wars Limited Edition 'One Plus 5T' | 'वन प्लस ५ टी'ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन

'वन प्लस ५ टी'ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन

Next

काही दिवसांपासूनच भारतीय बाजारपेठेत वन प्लस 5 हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. आता हा स्मार्टफोन स्टार वॉर्स लिमिटेड एडिशनच्या माध्यमातून नवीन स्वरूपात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. नावातच नमूद असल्यानुसार स्टार वॉर्स या लोकप्रिय चित्रपट मालिकेच्या थीमचा यात उपयोग करण्यात आला आहे. बंगळुरू शहरात सुरू असणार्‍या कॉमिक कॉन-२०१७ या कार्यक्रमात संबंधीत स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली. याचे मूल्य तसेच अन्य ऑफर्सला जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, याच्या प्रतिमेचा टीझर जारी करण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी स्टार वॉर्स : द लास्ट जेडी हा चित्रपट प्रदर्शीत होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, वन प्लस ५ टी या मॉडेलची यावर आधारित आवृत्ती लाँच करण्यात आल्याचे मानले जात आहे. यात संबंधीत चित्रपटाचे बोधचिन्ह मागील बाजूस दर्शविण्यात आलेले आहे. 

यातील उर्वरित फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच राहण्याची शक्यता आहे. अर्थात यात ६.०१ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५डी फुल ऑप्टीक डिस्प्ले असेल. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असेल. याचे ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट आहेत. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स सोनी आयएमक्स ३९८ सेन्सरयुक्त असेल. तर दुसरा कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह २० मेगापिक्सल्स सोनी आयएमएक्स३७६के सेन्सरयुक्त देण्यात आला आहे.

तर यात १६ मेगापिक्सल्सचा सोनी आयएमएक्स३७१ सेन्सरयुक्त फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस ४.७.० या प्रणालीवर चालणारा आहे. यात फेस अनलॉक हे विशेष फिचर देण्यात आले आहे.  वनप्लस ५ टी या स्मार्टफोनमध्ये कंपनीच्या डॅशचार्ज हा फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान आहे.

Web Title: Star Wars Limited Edition 'One Plus 5T'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.