Airtel, Elon Musk : एलन मस्क यांना एअरटेल टक्कर देण्याच्या तयारीत; भारतासाठी तयार केला 'हा' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 12:21 PM2022-01-06T12:21:38+5:302022-01-06T12:22:03+5:30
सुनील मित्तल यांची भारती एअरटेल (Bharati Airtel) एलन मस्क यांच्या स्टारलिंकला (Starlink) टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
उद्योजक सुनील मित्तल (Sunil Mittal) यांची कंपनी भारती एअरटेल (Bharati Airtel) ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त एलन मस्क यांच्या कंपनीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सॅटलाईट ब्रॉडबँड (Satellite Broadband) सेवांसाठी या कंपन्या एकमेकांसमोर येणार आहे. एलन मस्क यांची स्टारलिंक (Elon Musk Starlink) आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्या भारतात ब्रॉडबँड सेवा देण्याच्या योजनेवर काम करत आहेत.
भारती एअरटेलनं भारतात सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी जॉईंट व्हेन्चरची घोषणा केली आहे. या जॉईंट व्हेन्चरमध्ये एअरटेलशिवाय ह्युजेस नेटवर्क सिस्टमची सब्सिडरी ह्युजेस कम्युनिकेशन्स इंडियाही असणार आहे. एका निवेदनानुसार, या व्हेन्चरच्या माध्मयातून दोन्ही कंपन्यांच्या विसॅट व्यवसायाला एकत आणलं जाईल आणि सॅटेलाईटच्या कनेक्टिव्हीटीद्वारे प्राथमिक परिवहन, बॅकअर आणि हायब्रिड संबंधी उद्योग नेटवर्किंग सोल्युशन सादर करणार आहे. या कराराची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती. एनसीएलटी (NCLT) आणि टेलिकॉम विभागाच्या मंजुरीनंतर जॉईंट व्हेन्चरची स्थापना करण्यात आली.
काही आठवड्यांपूर्वी भारत सरकारनं म्हटलं होतं की स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेसकडे भारतात सॅटेलाईटवर आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी परवाना नाही. याचदरम्यान स्टारलिंक इंडियाच्या संजय भार्गव यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी लिंक्डइन पोस्टद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. संजय भार्गव हे भारतात स्टारलिंकच्या संवांच्या योजनेवर काम करत होते.