अडथळ्यांवर मात करणारा ‘स्टंबल गाईज’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 11:55 AM2023-11-26T11:55:56+5:302023-11-26T11:56:35+5:30

Stumble Guys: भारतातील कित्येक मुला-मुलींमध्ये हा गेम प्रसिद्ध आहे. ‘स्टंबल गाईज गेम’ खेळताना शेवटपर्यंत टिकून राहायचं इतकंच काय ते डोक्यात ठेवायचं असतं. या गेमचे कंट्रोल्स अगदी साधे आणि सोपे आहेत.

'Stumble Guys' Overcome Obstacles | अडथळ्यांवर मात करणारा ‘स्टंबल गाईज’

अडथळ्यांवर मात करणारा ‘स्टंबल गाईज’

- समीर गुडेकर 
(गेमिंग अभ्यासक) 

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तकेशिस कॅसल या जपानी गेम शोबद्दल कधी ना कधी तरी ऐकलंच असेल किंवा पाहिलेदेखील असेल. जसे या गेममध्ये वेगवेगळ्या आणि पुढे कठीण होत जाणाऱ्या अडथळ्यांवर मात करून शेवटपर्यंत पोहोचायचे असते, अगदी तसेच काहीसे स्टंबल गाईज या गेममध्ये आपल्याला खेळायला मिळते.

नेटफ्लिक्सवरील स्किड गेम नावाची एक कोरियन वेब सिरीजही याच थीमवर आधारित आहे. अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीवर आधारलेला स्टंबल गाईज हा बॅटल रॉयल गेम आहे. २०२०मध्ये कितका गेम्स या कंपनीने रिलीज केलेला हा गेम २०२२ पर्यंत चार कोटी लोकांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यात आला. अत्यंत सोपा त्याचबरोबर उत्सुकता वाढवणारा हा मोबाइल गेम कंप्युटर गेम फॉल गाईजवरून प्रेरित आहे.

गुंतागुंतीची रचना 
भारतातील कित्येक मुला-मुलींमध्ये हा गेम प्रसिद्ध आहे. स्टंबल गाईज गेम खेळताना शेवटपर्यंत टिकून राहायचं इतकंच काय ते डोक्यात ठेवायचं असतं. या गेमचे कंट्रोल्स अगदी साधे आणि सोपे आहेत. हा गेम ग्राफिकली चांगला आहे. सोबतीला आकर्षक संगीत आहे. त्याचबरोबर थोडी गुंतागुंतीची रचना या गेममध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. 

तीन फेऱ्यांमधून विजेत्याची निवड
तब्बल ३२ जणांना एकत्रितपणे हा गेम खेळता येण्याजोगा आहे. या ३२ जणांपैकी फक्त एकटा विजेता ठरतो. त्या एका विजेत्याला निवडण्यासाठी एकूण तीन फेऱ्या होतात. पहिल्या फेरीमध्ये ३२ जण एकत्र खेळतात. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये ३२ पैकी फक्त १६ जण पुढे जातात आणि शेवटच्या फेरीमध्ये फक्त आठ जण जातात. आता आठ जणांपैकी एक जण विजेता ठरतो.

स्वतःला खाली पडू द्यायचं नाही
गेम खेळणाऱ्या ३२ जणांची चढाओढ ही मॅप्समध्ये होते. या मॅप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्तथरारक अडथळे असतात. या अडथळ्यांना पार करत करत विजयी रेषा पार करायची असते. काहीवेळा तर आपल्याला स्वतःला पडू द्यायचं नसतं. शेवटपर्यंत स्वतःला जो सावरून ठेवेल तो विजयी ठरतो. हा गेम खेळत असताना आपण स्वतःला खाली पडू द्यायचं नाही, ही दक्षता आपण घ्यायची असते.

काही खास टीप्स 
गेममधील साऱ्या मॅप्स आणि अडथळ्यांची आधीच माहिती करून घेणे.
अडथळ्यांवरून उडी मारताना त्याचे योग्य नियोजन करणे आणि संधी साधून योग्यवेळी उडी मारणे.
सुरुवातीला खाली पडण्यापासून स्वतःला थांबवू नका. आपल्याला चेकपॉइंटपासून पुन्हा गेममध्ये नवी सुरुवात करता येते.

Web Title: 'Stumble Guys' Overcome Obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.