'या' अॅपद्वारे फ्री इंटरनेचा घेता येईल आनंद! रिचार्जशिवाय पाहा OTT चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 05:57 PM2023-03-08T17:57:09+5:302023-03-08T19:37:51+5:30
शुगरबॉक्स (SugarBox) अॅप तुमच्या Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता.
नवी दिल्ली : जर तुम्हाला इंटरनेट वापरायचे असेल आणि खर्चही करावा लागत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मोफत वायफाय सेवेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मोफत इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. तुम्ही हे शुगरबॉक्स (SugarBox) अॅप तुमच्या Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता. या अॅप अंतर्गत, युजर्स इंटरनेटशिवाय OTT अॅप्सवर चित्रपट आणि शो पाहू शकतात. याशिवाय, तुम्ही इतर ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता आणि ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकता.
SugarBox : असा करा वापर
- मोफत वायफाय सेवेचा लाभ घेण्यासाठी Apple App Store आणि Google Play Store वरून SugarBox अॅप डाउनलोड करा.
- यानंतर, या सेवेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या फोनची इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करा.
- यानंतर, SugarBox अॅपची वायफाय कनेक्टिव्हिटी ऑन करा आणि SugarBox वायफायशी कनेक्ट करा.
- येथे आता तुम्ही हाय क्वॉलिटीचे म्युझिक आणि शो विनामूल्य पाहू शकता.
- याशिवाय तुम्ही हे अॅप तुमच्या स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवरही वापरू शकता.
- या वायफाय सेवेची रेंज 100 मीटर आहे. यामध्ये यूजर्स इंटरनेटशिवाय ओटीटी अॅप्सचा लाभ घेऊ शकतात.
- तसेच, यूजर्स या अॅपद्वारे गेमिंग आणि सोशल मीडिया अॅप्स देखील वापरू शकतात.
फ्लाइटमध्ये सुद्धा मिळेल कनेक्टिव्हिटी
या सेवेच्या मदतीने तुमचा कंटाळवाणा विमान प्रवास सुद्धा मजेशीर होईल. तुम्ही ही सेवा फ्लाइटमध्ये देखील वापरू शकता. म्हणजेच फ्लाइटमध्ये फोन एअरप्लेन मोडवर ठेवल्यानंतर तुमचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही. आता तुम्ही फ्लाइटमध्ये OTT अॅप्स वापरू शकता. तसेच चित्रपट आणि शो पाहू शकता. याशिवाय, फ्लाइटमध्ये गेमिंग आणि ऑनलाइन शॉपिंगही करता येते.