लै भारी! गुगल करणार मोठा बदल; Gmail वरून करता येणार थेट कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 07:11 PM2021-09-09T19:11:36+5:302021-09-09T19:12:10+5:30
Direct Calling कॉलिंग फिचर सर्वप्रथम Gmail अॅपमध्ये येणार आहे. या फिचरमुळे कोणत्याही युआरएलविना तुमच्या सहकाऱ्याला तुम्ही कॉल करू शकता.
गुगल मीटमध्ये थेट कॉल करणे सोप्पे होणार आहे. झूम, गुगल मीट आणि इतर अॅप्समध्ये व्हिडीओ कॉल करण्यासाठी एक युआरएल जेनरेट करावी लागते. ग्रुप कॉल्स आणि मिटींग्ससाठी ही पद्धत योग्य ठरते. परंतु जेव्हा फक्त दोन व्यक्तींना संवाद साधायचा असतो तेव्हा ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटते. आता लवकरच गुगल मीटवरून कॉल करण्याची पद्धत बदलणार आहे. मीटिंग क्रिएट करून त्यानंतर युआरएल जेनरेट करण्याची पद्धत बंद केली जाणार आहे.
Direct Calling कॉलिंग फिचर सर्वप्रथम Gmail अॅपमध्ये येणार आहे. या फिचरमुळे कोणत्याही युआरएलविना तुमच्या सहकाऱ्याला तुम्ही कॉल करू शकता. डायरेक्ट कॉलची माहिती फोन आणि जीमेल लॉगिन असलेल्या वेब ब्राउजरवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून देण्यात येईल.
या फिचरसह गुगल Companion mode वर देखील काम करत आहे. ज्यात गुगल मीटमधील सहभागी लोक लॅपटॉपचा वापर सेकंड स्क्रीन प्रमाणे करू शकतील. हे फिचर नोव्हेंबरमध्ये युजर्सच्या भेटीला येईल. तसेच लाईव्ह ट्रान्स्लेटड कॅप्शन फिचर देखील या वर्षाच्या अखेर मिळेल. ज्यात इंग्रजी मधून फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज अश्या भाषांमध्ये भाषांतर मिटिंगमध्ये बघायला मिळेल.
गुगल मॅपच सांगेल किती भरायचा टोल
या सुविधेमध्ये प्रवाशांच्या मार्गातील सर्व टोल गेट्सची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होईल. त्यातून प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोलची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू करायच्या आधीच मिळेल. टोल गेट्सचा मार्ग स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेणे प्रवाशांना त्यामुळे सोयीचे होईल. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर सर्वच देशांत उपलब्ध असेल का, याची माहिती मात्र तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.