रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 07:50 PM2020-08-24T19:50:33+5:302020-08-24T20:31:24+5:30

टाटा ग्रुप ई-कॉमर्स सुपर अ‍ॅप बाजारात आणणार आहे. या अ‍ॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवा असतील.

Tata Group Likely To Launch Super App By December To Take On Reliance And Amazon | रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App'

रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App'

Next
ठळक मुद्देटाटा ग्रुपचे हे अ‍ॅप 2020 डिसेंबरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सहभाग असणारी टाटा ही देशातील एकमेव कंपनी आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स फेसबुक, मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे. यानतंर रिलायन्स अ‍ॅमेझॉनसोबत सुद्धा करार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून रिलायन्स जिओमार्टला सुपर अ‍ॅप म्हणून वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली. 

यातच आता ताज्या माहितीनुसार, टाटा ग्रुप ई-कॉमर्स सुपर अ‍ॅप बाजारात आणणार आहे. या अ‍ॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवा असतील. चीनचे सुपर अ‍ॅप वेचॅटसारखे टाटाचे सुद्धा सुपर अ‍ॅप असणार आहे. त्यामुळे रिलायन्स, अ‍ॅमेझॉन टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.

डिसेंबरपर्यंत लाँच होऊ शकते अ‍ॅप 
टाटा ग्रुपचे हे अ‍ॅप 2020 डिसेंबरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सहभाग असणारी टाटा ही देशातील एकमेव कंपनी आहे. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, "हे एक सुपर अ‍ॅप असेल ज्यामध्ये अनेक अ‍ॅप्स असतील. आमच्यासाठी ही खूप मोठी शक्यता आहे."

या सर्व सुविधा उपलब्ध होणार
टाटा ग्रुपच्या कंपन्यांविषयी सांगायचे म्हटले तर सध्या शॉपिंग अ‍ॅप टाटा क्लिक, ग्रोससी आणि ई-स्टोअरसाठी स्टार क्लिक आणि ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म म्हणून क्रोमा हे शॉपिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून टाटा ग्रुप कंज्यूमर ड्यूरेबल्स, इंश्योरन्स, फायनान्स सर्व्हिस, हेल्थकेअर आणि बिल पेमेंट यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

 

Web Title: Tata Group Likely To Launch Super App By December To Take On Reliance And Amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.