8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 22, 2021 03:56 PM2021-10-22T15:56:14+5:302021-10-22T15:56:25+5:30

TCL Tab Pro 5G Android Tablet Price: TCL Tab Pro 5G Tablet कंपनीने 10.36 इंचाचा डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8000mAh बॅटरीसह सादर केला आहे.  

Tcl tab pro 5g tablet launch with snapdragon 480 5g chipset know price specification details  | 8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Next

TCL जुलै महिन्यात तीन टॅबलेट भारतीय बाजारात दाखल केले होते. या टॅब्सची किंमत 15,999 रुपयांपासून सुरु होते. हे टॅब कंपनीने 4G कनेक्टिव्हिटीसह सादर केले होते. आता TCL Tab Pro 5G जागतिक बाजारात सादर केला आहे जो 5जी कनेक्टिविटीसह येतो. तसेच यात Snapdragon 480 प्रोसेसर, 10.36 इंचाचा डिस्प्ले आणि 8000mAh ची बॅटरी दिली आहे.  

TCL Tab Pro 5G ची किंमत  

जागतिक बाजारात TCL Tab Pro 5G ची किंमत 399 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 29,908 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा टॅब मेटॅलिक ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच भारतीय बाजारात देखील हा डिवाइस कंपनी सादर करेल अशी अपेक्षा आहे.  

TCL Tab Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स 

टीसीएल टॅब प्रो 5जी मध्ये 10.36 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक फुल-एचडी रिजोल्यूशन असलेला NXTVISION डिस्प्ले आहे, जो HRD ला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने यात स्नॅपड्रॅगन 480 5जी प्रोसेसरचा वापर केला आहे. तसेच या टॅबमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हा टॅब 11 अँड्रॉइड 11 वर चालतो. 

कंपनीने या डिवाइसयामध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या टॅबमधील 8000mAh ची बॅटरी 17 तासांचा बॅकअप देते असा दावा कंपनीने केला आहे. ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच रिवर्स चार्जिंगच्या मदतीने या टॅबचा वापर पॉवरबँक म्हणून देखील करता येईल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात फेस अनलॉक व फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. 

Web Title: Tcl tab pro 5g tablet launch with snapdragon 480 5g chipset know price specification details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.