मोबाईल नेटवर्कशिवाय आता करा इंटरनेट कॉल, बीएसएनएलची नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 10:28 AM2019-02-02T10:28:17+5:302019-02-02T10:57:46+5:30

भारत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)नं ग्राहकांना एक नवी योजना उपलब्ध करून दिली आहे.

tech bsnl wings app allow users to make internet call without mobile network | मोबाईल नेटवर्कशिवाय आता करा इंटरनेट कॉल, बीएसएनएलची नवी शक्कल

मोबाईल नेटवर्कशिवाय आता करा इंटरनेट कॉल, बीएसएनएलची नवी शक्कल

googlenewsNext
ठळक मुद्देरत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)नं एक नवी शक्कल लढवली आहे. बीएसएनएलचं नेटवर्क बऱ्याच ठिकाणी खराब आहे, तर काही भागात बीएसएनएलचं नेटवर्कच नाही.बीएसएनएलनं खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या भागासाठी Wings Application हे अ‍ॅप लाँच केलं आहे.

 नवी दिल्ली: भारत दूरसंचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)नं एक नवी शक्कल लढवली आहे. बीएसएनएलचं नेटवर्क बऱ्याच ठिकाणी खराब आहे, तर काही भागात बीएसएनएलचं नेटवर्कच नाही. अशा परिस्थितीतही आपल्याला बीएसएनएलवरून इंटरनेट कॉल करता येणार आहे. बीएसएनएलनं खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या भागासाठी Wings Application हे अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीनं यूजर्स नेटवर्क नसतानाही इंटरनेट कॉल करू शकणार आहेत. त्यासाठी या अ‍ॅप्ससह वायफायचा वापर करता येणार आहे.  

बीएसएनएलचं हे विंग्स अ‍ॅप्स वापरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. युजर्सला स्वतःच्या ओळखपत्राच्या पुराव्यांसह पत्ता आणि फोटो देऊन या सेवेसाठी नोंदणीकृत व्हावे करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युजर्सला Wings Pin पाठवण्यात येणार आहे. युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून विंग्स अ‍ॅप डाऊनलोड अन्  इन्स्टॉल केल्यानंतर विंग्स पिन जमा करावा लागणार आहे.

युजर्सला VoIP (Voice over Internet Protocol)ची उत्तम दर्जाची सुविधा मिळावी, यासाठीच हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. जिथे मोबाइल नेटवर्क नसेल तिथूनही आपण विंग्स अ‍ॅपच्या मदतीनं कॉल करू शकणार आहात. इमारतीच्या बेसमेंट(तळाला)मध्ये गेल्यास बऱ्याचदा नेटवर्क मिळत नाही. अशातच या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण कोणालाही इंटरनेट कॉल करू शकता. याचा फायदा 2G, 3G, 4G सेल्युलर नेटवर्कशिवाय वायफाय वापरकर्त्यांनाही होणार आहे.  

कसं सुरू कराल BSNL VoIP सर्व्हिस ?
सर्वात आधी प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल, त्यानंतर 1,099 रुपये भरावे लागतील. पेमेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर विंग्स अ‍ॅप एक वर्षासाठी एक्टिवेट करण्यात आलं आहे. या अ‍ॅपशिवाय युजर्सला एसआयपी(Session Initiation Protocol)ही डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर 10 डिजिटला एक सब्सक्रिप्शन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणीकृत मेलआयडीवरून 16 डिजिटचा पिन पाठवावा लागेल. हे पिन एंटर केल्यानंतर युजर्स Wings सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. 

Web Title: tech bsnl wings app allow users to make internet call without mobile network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.