फेसबुकवर कोणीतरी गुपचूप तुमचं प्रोफाईल चेक करतंय?; 'या' भन्नाट ट्रिकने झटपट मिळेल माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:24 PM2021-12-06T19:24:52+5:302021-12-06T19:32:10+5:30
Facebook Profile : फेसबुकवर एकमेकांचे प्रोफाईल फोटो पाहणे नियमित झाले आहे. अनेकदा काही लोक गुपचूप प्रोफाईल चेक करतात.
फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. बहुतांश लोक मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग, ऑनलाईन गेम आणि व्हिडीओ पाहण्यासाठी याच प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. एखादी व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरते की नाही हे देखील बहुतांश लोक फेसबुकच्या माध्यमातूनच शोधतात.
फेसबुकवर एकमेकांचे प्रोफाईल फोटो पाहणे नियमित झाले आहे. अनेकदा काही लोक गुपचूप प्रोफाईल चेक करतात. तुम्हाला तुमचे फेसबुकवरील प्रोफाईल कोणी पाहिले आहे, हे जाणून घ्यायचे असल्यास यासाठी सोपी ट्रिक वापरावी लागेल. या ट्रिकद्वारे तुमचं फेसबुक प्रोफाईल कोणी पाहिलं हे लगेचच समजणार आहे.
असं तपासा तुमचं फेसबुक प्रोफाईल कोणी पाहिलं?
- तुमचे Facebook अकाउंट कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉपवर ओपन करा.
- त्यानंतर स्क्रीनवर फेसबुक पेज ओपन करा.
- आता माऊसने राइट क्लिक करा.
- आता तुम्हाला व्ह्यू पेज सोर्सचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
- सोर्स पेज ओपन झाल्यानंतर CTRL+F दाबा.
- आता सर्च बॉक्स ओपन होईल, त्यात BUDDY_ID एंटर करा.
- आता BUDDY_ID च्या पुढे 15 आकडी आयडी दिसेल, तो कॉपी करा.
- पुढे Facebook.com/15-digit ID लिहून एंटर करा.
- आता त्या यूजरचा आयडी ओपन होईल, ज्याने तुमचे फेसबुक प्रोफाईल पाहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.