मायक्रोसॉफ्ट, टेक डेटा कंपन्यांतर्फे पुण्यात टेक मार्टचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 09:17 PM2022-11-23T21:17:10+5:302022-11-23T21:17:19+5:30
डिजिटल अर्थव्यवस्थेत व्यवसायांना पाठबळ
पुणे : महाराष्ट्रातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एमएसएमईची परिसंस्था प्रगतीशील ठरत आहे. मायक्रोसॉफ्ट आणि टेक डेटा या टीडी सिनेक्स कंपनीतर्फे २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात टेक मार्टचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील उद्योगांना तंत्रज्ञानाचे पर्याय, साधने आणि मार्गदर्शन पुरवून साह्य करणे तसेच त्यांच्या आजघडीच्या आणि भविष्यातील अनोख्या गरजा पूर्ण करणे, हा यामागील उद्देश आहे. या ठिकाणी कंपन्यांना आपल्या व्यवसायातील आव्हानांसंदर्भात प्रत्यक्ष आणि ‘वन-टू-वन’ सल्लामसलत करून आपल्या डिजिटल बदलांच्या प्रवासाला वेग देता येईल. या टेक मार्टमध्ये कोलॅबॅरेशन, सेक्युरिटी, प्रोडक्टिव्हिटी, होस्टिंग सुविधा आणि क्लाऊडवरील अॅप्लिकेशन, फायनान्स अॅण्ड ऑपरेशन्स, एचआर आणि अगदी कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट अशा विविध विषयांवरील पर्याय उपलब्ध असतील. https://smbtechmart.in/ या वेबसाईटवर अधिक माहिती मिळणार आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कॉर्पोरेट, मीडिअम अॅण्ड स्मॉल बिझनेस विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (कार्यकारी संचालक) समिक रॉय म्हणाले, “मायक्रोसॉफ्टने देशातील अनेक एसएमबीजना क्लाऊडवर जाण्यात साह्य केले आहे. या व्यवसायांना सुरक्षित, वाजवी दरातील आणि वापरण्यास सोपे तंत्रज्ञान आणि पर्याय देऊ करत त्यांना सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सातत्याने गुंतवणूक करत आहे.”
एक विश्वासार्ह तंत्रज्ञान नेतृत्व म्हणून मायक्रोसॉफ्टने भारतातील २,००,००० हून अधिक एसएमबी ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. देशभरातील १७,००० हून अधिक भागीदारांच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट या एसएमबीजना साह्य करते. त्याचप्रमाणे, त्यांच्या डिजिटल बदलांच्या संपूर्ण प्रवासात त्यांची आयटीमधील वाटचालीसंदर्भातील धोरणे, खरेदी, डिप्लॉयमेंट आणि व्यवस्थापन यात लवचिकता असेल, याची खातरजमा केली जात आहे.