जाम भारी क्रिएटीव्हिटी!! मोटोरोलाचा नवा अविष्कार; हवा तेव्हा स्मार्टफोन, हवं तेव्हा घड्याळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:30 PM2023-10-27T16:30:38+5:302023-10-27T16:32:58+5:30
मोटोरोला लवकरच युजर्ससाठी एक भन्नाट स्मार्टफोन लाँच करणार
Motorola Band Smartphone : चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola नेहमी आपल्या नावीन्यतेसाठी ओळखली जाते. मोटोरोलाने आपल्या युजर्ससाठी एक नवीन डिव्हाइस सादर करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच असे समोर आले आहे की मोटोरोला एक नवीन बँड फोन लॉन्च करणार आहे, जो तुम्हाला स्मार्टफोनसारखा वापरता येईल, त्यासोबतच तुमच्या मनगटाभोवतीही गुंडाळता येईल. मोटोरोला ने त्याच्या Lenovo Tech World इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टफोनचा प्रोटोटाइप लाँच केला आहे. हा नवीन बँड फोन शोकेस पीस आहे करतो. या प्रोटोटाइपने या आगामी उपकरणाचा डिस्प्ले लवचिक (flexible) असल्याचे दाखवले आहे. हे उपकरण इतके लवचिक आहे की तुम्ही ते तुमच्या मनगटावर ते बँडप्रमाणे घालू शकता. मात्र, हे डिव्हाईस कधी लॉन्च होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
2016 मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना-
कंपनीने सर्वप्रथम हा 2016 मध्ये असा प्रकार सादर केला होता, ज्याला wrist phone म्हणतात. त्यानंतर कंपनीने या उपकरणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता तब्बल सात वर्षांनंतर त्यांनी पुन्हा या उपकरणाबद्दल बोलण्यास सुरूवात केली आहे.
बँड फोनची विशेष वैशिष्ट्ये-
- या फोनच्या डिस्प्लेबाबत काही माहिती समोर आली आहे. असे दिसून येते की जेव्हा तुम्ही हे डिव्हाइस सरळ धरून ठेवता तेव्हा त्याचा डिस्प्ले 6.9 इंच असतो. जर तुम्ही ते फोल्ड केले तर त्याचा आकार 4.9 इंच एवढा होतो.
- डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला फोनच्या मागील बाजूस एक कापडासारखा प्रकार असतो, ज्यामुळे तो सहज बँड म्हणून वापरता येतो.
- कंपनी यातून तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे ओळख करून देणार आहे.
- कंपनीचा नवीन फोन फोल्ड करण्यायोग्य आणि रोल करण्यायोग्य असून तशा परिस्थितीतही चांगले काम करून शकेल.
- त्याच्या मदतीने कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देऊ शकेल. आता कंपनी हा फोन कधी बाजारात आणते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.