तंत्रज्ञानाचे संक्रमण

By अनिल भापकर | Published: January 13, 2018 07:57 PM2018-01-13T19:57:22+5:302018-01-14T01:44:31+5:30

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करायचे आदी सोशल मीडियावर त्या त्या सणाच्या काही दिवस अगोदर फिरत असते. म्हणजेच आजच्या धावपळीच्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल.

Technology transformation | तंत्रज्ञानाचे संक्रमण

तंत्रज्ञानाचे संक्रमण

googlenewsNext
ठळक मुद्देआजकाल तंत्रज्ञान म्हटले कि प्रामुख्याने स्मार्टफोन आणि सोशल मीडिया याच विषयीची चर्चा होते कारण ‘सोशल मीडिया’चा वापर हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे.नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल. सोशल मीडिया हे आपल्या हाती आलेले एक मोठे अस्र आहे आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा कि वाईटासाठी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.हे तंत्रज्ञानाचे संक्रमण आपण कशा पद्धतीने स्वीकारायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. संक्रमण हा जगाचा नियमच आहे आणि संपूर्ण जग या नियमाला बांधील आहे, त्यामुळे ते स्वीकारणे आणि जगाच्या गतीसोबत आपली गती कायम राखणे आपल्याला अनिवार्य आहे. या संक्रमण प्रक्रियेला तंत्रज्ञानाचा तरी कसा अपवाद राहील.

आजकाल तंत्रज्ञान म्हटले कि प्रामुख्याने स्मार्टफोन आणि सोशल मीडिया याच विषयीची चर्चा होते कारण ‘सोशल मीडिया’चा वापर हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ट्वीटरसारख्या सोशल मीडियाने सर्वसामान्यांचे जीवनच व्यापून टाकले आहे एवढी मोठी व्याप्ती या सोशल मीडिया ची आहे.

ज्या लोकांना कधी काळी चार ओळीचे पत्र लिहिताना सुद्धा घाम फुटायचा ते लोक आता फेसबुक आणि व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया च्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहे.आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहे.सोशल मीडिया च्या गैरवापरावरून नेहमी टिका होते.खरेतर सोशल मीडिया हा चांगला कि वाईट यावर अनेकदा चर्चा होते मात्र कोणताही मीडिया हा कधीही चांगला किंवा वाईट नसतो. त्याचा वापर करणारा त्याचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते.

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करायचे आदी  सोशल मीडियावर त्यात्या सणाच्या काही दिवस अगोदर फिरत असते. म्हणजेच आजच्या धावपळीच्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल.

त्यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. सोशल मीडियाला दुय्यम समजण्याची आवश्यकता नाही आणि त्याच वेळी त्याला अवास्तव महत्त्व देण्याचीही गरज नाही.अनेकदा आपण जी माहिती सोशल मीडियावर फॉरवर्ड करत असतो त्याची सत्यता पडताळून मगच ती शेअर करायला हवी.सोशल मीडिया हे आपल्या हाती आलेले एक मोठे अस्र आहे आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा कि वाईटासाठी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.हे  तंत्रज्ञानाचे संक्रमण आपण कशा पद्धतीने स्वीकारायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

Web Title: Technology transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.