Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 09:57 AM2024-07-09T09:57:29+5:302024-07-09T09:58:20+5:30

Technology: सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता दर दिवशी त्यात नवनवे फीचर्स ऍड केले जातात, त्यातच नव्याने दिसणारे निळे वर्तुळ कसले ते पाहूया. 

Technology: What exactly is the blue circle seen on WhatsApp, Instagram, Facebook for? find out | Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या

Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईलची भर पडली आहे. अशातच एखाद्याचे बँक अकाउंट एकवेळ नसेल पण सोशल मीडिया अकाउंट नक्कीच असेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. लोकांचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात जात आहे. हे ओळखून सोशल मीडिया सेवा देणाऱ्या संस्था ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी दरदिवशी नवनवे फीचर्स देत आहे. यात भर पडली आहे मेसेंजरवर दिसणाऱ्या निळ्या वर्तुळाची!

तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे नवीन निळे वर्तुळ कधी आले हे तुम्हालाही लक्षात आले नसेल. अनेक जणांना तर त्याचा उपयोग काय हेही माहीत नसेल. ती माहिती देण्यासाठीच हा लेख! 

वास्तविक, हे निळे वर्तुळ Meta AI चे प्रतिनिधित्व करते, Meta ने लॉन्च केलेला हा स्मार्ट असिस्टंट आहे. हे फिचर आपण विनामूल्य वापरू शकतो. Meta AI दोन महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आले होते, परंतु ते फक्त काही देशांमध्ये उपलब्ध होते. आता ते भारतातही उपलब्ध करण्यात आले आहे. 

Meta AI हे एक अतिशय प्रगत AI मॉडेल आहे, जे तुमच्या माहितीपर प्रश्नांची उत्तरे तात्काळ देऊ शकते. डॉक्युमेंट बनवण्यासाठी मदत करू शकते आणि भाषांचे भाषांतर देखील करू शकते. ईमेल लिहिण्यासाठी, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी, एक्सेल शीट बनवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. हे AI मॉडेल LLMA-3 मॉडेलवर आधारित आहे, जे जगातील सर्वात प्रगत भाषा मॉडेलपैकी एक आहे.

Meta AI ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते थेट Facebook आणि Instagram फीडवरून वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला Facebook वर पोस्ट दिसली आणि त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही पोस्टवरून थेट Meta AI ला विचारू शकता. शिवाय व्हाट्स अप वर आपण जसे चॅटिंग करतो किंवा गुगल सर्च करतो, त्यानुसार निळ्या वर्तुळावर क्लिक करून माहिती विचारली तरी पुढच्या सेकंदाला तुम्हाला उचित रिप्लाय मिळू शकतो. 

जिथे त्याच्याकडे माहितीची कमतरता असेल अशा विषयाबाबत तो नम्रपणे नकार देतो आणि याबद्दल तुमच्याकडे माहिती उपलब्ध असल्यास तुम्ही ती फीड करा असेही सांगतो. एकूणच काय तर माहिती द्यायला हाकेसरशी एक वाटाड्या आपल्याला उपलब्ध झाला आहे. इंग्रजी शिकण्यापासून ते करिअर मधील प्रगतीपर्यंत हर तऱ्हेच्या विषयांवर त्याच्याकडून माहिती घेऊया आणि तंत्रज्ञानाचा सदुपयोग करूया. 

Web Title: Technology: What exactly is the blue circle seen on WhatsApp, Instagram, Facebook for? find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.