खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 10:59 AM2019-08-06T10:59:38+5:302019-08-06T11:03:10+5:30

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवरचे अनेक फीचर हे युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात.

technology whatsapp latest upcoming features | खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

Next

नवी दिल्ली - इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवरचे अनेक फीचर हे युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात. फेक न्यूज आणि अफवांपासून वाचण्यासाठी अनेक फीचर मदत करत असतात. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर आहे कारण लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर तीन नवीन दमदार फीचर येणार आहेत. 

WhatsApp Frequently Forwarded

व्हॉट्सअ‍ॅप फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड फीचरच्या मदतीने युजर्सना फॉरवर्डेड मेसेजची माहिती मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आधीपासून फॉरवर्ड मेसेजचं लेबल दाखवलं जातं. मात्र त्यावेळी Single Arrow दाखवला जातो. मात्र आता या फीचरच्या मदतीन पाच पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड केलेला मेसेज आला तर Double arrow दाखवला जाईल. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही युजर्सना याचा फायदा होणार आहे. 

फोटो सेंड करताना चूक होणार नाही

व्हॉट्स्अ‍ॅपवर फोटो पाठवणं या फीचरच्या मदतीने सोपं होणार आहे. फोटो पाठवताना उजव्या बाजूला खालच्या दिशेला ज्या व्यक्तीला आपण फोटो पाठवणार आहोत. त्याचं नाव दिसणार आहे. तसेच त्याचा प्रोफाईल फोटो देखील दिसेल. 

Hide Muted Status

अ‍ॅन्ड्रॉईड अपडेट 2.18.183 मध्ये युजर्सना म्यूट केलेले अपडेट्स हाइड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याआधी म्यूट केलेले स्टेटस युजर्सना स्टेटस लिस्टमध्ये सर्वात खाली दिसत होते. मात्र आता ते पाहता येणार आहेत. त्यासाठी नवा पर्याय देण्यात येणार असून तो युजर्ससाठी फायदेशीर आहे. 

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'

व्हॉट्सअ‍ॅपवर काही फोटो किंवा व्हिडीओ हे युजर्सना दुसऱ्यांना सेंड करायचे नसतात. तर स्वत: कडेच ठेवायचे असतात. यासाठी एक खास ट्रिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला सीक्रेट ग्रुप तयार करण्यासाठी काही मिनिटांसाठी कोणत्यातरी एका मित्राला आपल्या या नव्या ग्रुममध्ये सामील करावं लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या नावाने एक नवा ग्रुप तयार करा. काही मिनिटांसाठी त्यामध्ये आपल्या एका मित्राला अ‍ॅड करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ग्रुप इंफोमध्ये जा. यासाठी ग्रुपच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यावर आपल्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवरचा तुमचा सीक्रेट ग्रुप तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही एकटेच असल्याने तुम्हाला हवे असलेले फोटो आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित आहेत. 

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं. आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा. आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा. चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही. आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अ‍ॅक्सेस करता येतं.

 

Web Title: technology whatsapp latest upcoming features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.