Tecno चे दोन भन्नाट फोन आले बाजारात; जाणून घ्या Camon 18 आणि Camon 18P चे स्पेसिफिकेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:37 PM2021-10-05T17:37:07+5:302021-10-05T17:37:20+5:30
Budget Mobiles Tecno Camon 18 & Camon 18P: Tecno ने आपल्या कॅमोन 18 सीरीज अंतर्गत Tecno Camon 18 Premier, Tecno Camon 18 आणि Tecno Camon 18P हे फोन्स सादर केले आहेत.
Tecno ने आपल्या कॅमोन 18 सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन्स जागतिक बाजारात सादर केले आहेत. या सीरीजमध्ये Tecno Camon 18 Premier, Tecno Camon 18 आणि Tecno Camon 18P हे फोन्स सादर करण्यात आले आहेत. सध्या कंपनीने हे फोन सध्या नायजेरियामध्ये लाँच केले असून लवकरच हे डिवाइस भारतसह जागतिक बाजारात दाखल होतील. या नव्या स्मार्टफोन्सची किंमत मात्र अजून समोर आली नाही.
Tecno Camon 18 आणि Camon 18P चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Camon 18 आणि Camon 18P स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्समध्ये थोडाफार बदल आहे. हे दोन्ही फोन्स 6.8 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. परंतु Tecno Camon 18 मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तर Camon 18P स्मार्टफोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
हे दोन्ही Tecno स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 8.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कॅमोन 18 मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी88 चिपसेट, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. तर कॅमोन 18पी मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेट आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी कॅमोन 18 मध्ये 64MP मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा आहे. तर कॅमोन 18पी मध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा पोर्टरेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. दोन्ही फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.
हे दोन्ही फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 5,000एमएएचच्या बॅटरीसह सदर करण्यात आले आहेत. यातील कॅमोन 18 मॉडेल 18वॉट फास्ट चार्जिंगला तर कॅमोन 18पी मॉडेल 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हे दोन्ही मोबाईल फोन Polar Night आणि Vast Sky कलरमध्ये सादर करण्यात आले आहेत.