Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 11:57 AM2021-12-01T11:57:56+5:302021-12-01T11:59:07+5:30

Tecno Camon 18T Price: Tecno Camon 18T स्मार्टफोनमध्ये 48MP Selfie Camera, 4GB RAM, 48MP Rear Camera आणि 5000mAh Battery देण्यात आली आहे. हा फोन सध्या जागतिक बाजारात आला आहे.

Tecno Camon 18T launched with 48Mp selfie camera know Specs Price  | Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 

Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 

Next

TECNO नं आपला पोर्टफोलियो वाढवत Tecno Camon 18T स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या ‘कॅमोन 18 सीरीज’ अंतर्गत सादर करण्यात आला आहे. या डिवाइसची किंमत कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे, परंतु स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. Tecno Camon 18T स्मार्टफोनमध्ये 48MP Selfie Camera, 4GB RAM, 48MP Rear Camera आणि 5000mAh Battery देण्यात आली आहे.  

Tecno Camon 18T चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Camon 18T मध्ये 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.8 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले कंपनीनं दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कंपनीच्या हायओएस 8.0 वर चालतो. या फोनला मीडियाटेकच्या हीलियो जी85 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅम म्हणजे एकूण 7 जीबी रॅमसह बाजारात आला आहे. यातील 128 जीबी इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.  

48 मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरा ही टेक्नो कॅमोन 18टी ची खासियत आहे. विशेष म्हणजे या सेल्फी कॅमेऱ्यासह देखील कंपनीनं फ्लॅश दिला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.  

बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स ड्युअल सिम Tecno Camon 18T फोनमध्ये मिळतात. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवरील फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन फेस अनलॉक फीचर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी टेक्नो कॅमोन 18टी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18वॉट फ्लॅश चार्जला सपोर्ट करते.  

Tecno Camon 18T ची किंमत 

टेक्नो कॅमोन 18टी सध्या जागतिक बाजारात आला आहे. हा फोन Iris Purple, Dusk Gray आणि Ceramic White कलरमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 12,300 भारतीय रुपयांच्या आसपास आहे.  

Web Title: Tecno Camon 18T launched with 48Mp selfie camera know Specs Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.