मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Published: April 29, 2022 04:05 PM2022-04-29T16:05:54+5:302022-04-29T16:06:03+5:30

Tecno Phantom X स्मार्टफोन 48MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM, 4700mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 90Hz रिफ्रेश रेटसह भारतात आला आहे.  

Tecno Phantom X launched in India With 48MP Selfie Camera Sensor   | मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी  

मोठ्या सेल्फी कॅमेऱ्यासह Tecno Phantom X लाँच; किंमतही सर्वांना परवडणारी  

Next

Tecno ने भारतात Tecno Phantom X स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 48MP च्या ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. एवढं रिजोल्यूशन असलेला सेल्फी सेन्सर खूप कमी फोन्समध्ये मिळतो. बजेट फ्रेंडली डिवाइस सादर करणाऱ्या टेक्नो ब्रँडचा हा प्रीमियम डिवाइस आहे. त्यामुळे कमी किंमतीत देखील 8GB RAM, 4700mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग, हाय रिफ्रेश रेट OLED डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा सेटअप मिळतो. 

Tecno Phantom X स्पेसिफिकेशन्स 

Tecno Phantom X मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन दिलं आहे. हा एक कर्व डिस्प्ले आहे जो इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडरसह आला आहे.  

अँड्रॉइड 11 आधारित HiOS वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU मिळतो. यातील स्मार्ट कुलिंग सिस्टम फोनचं तापमान वाढू देत नाही. Phantom X मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.  

Tecno Phantom X ची खासियत म्हणजे यातील ड्युअल सेल्फी कॅमेरा. या ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची एक अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर वरच्या बेजलमध्ये एक LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेड लेन्स आणि क्वाड LED फ्लॅश देण्यात आला आहे.    

Tecno Phantom X ची किंमत  

Tecno Phantom X स्मार्टफोनचा एकच मॉडेल कंपनी भारतात सादर केला आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या हँडसेटची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन समर सनसेट आणि आइसलँड ब्लु अशा दोन रंगांत 4 मेपासून विकत घेता येईल. याची विक्री ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून केली जाईल. 

Web Title: Tecno Phantom X launched in India With 48MP Selfie Camera Sensor  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.