8GB रॅम आणि 48 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Tecno Phantom X लाँच; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2021 12:28 PM2021-06-25T12:28:59+5:302021-06-25T12:29:29+5:30
Tecno Phantom X price: Tecno ने Phantom X आफ्रिकन बाजारात सादर केला आहे. हा कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे.
Tecno ने Phantom X स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Tecno Phantom X मध्ये 8GB रॅमसह Helio G95 चिपसेट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Tecno Phantom X चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Phantom X मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक कर्व डिस्प्ले आहे जो इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडरसह आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित HiOS वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. Phantom X मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
Tecno Phantom X ची खासियत म्हणजे यातील ड्युअल सेल्फी कॅमेरा. या ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची एक अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर वरच्या बेजलमध्ये एक LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेड लेन्स आणि क्वाड LED फ्लॅश देण्यात आला आहे.
Tecno Phantom X ची किंमत आणि उपलब्धता
Tecno ने Phantom X सध्या आफ्रिकन बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनची किंमत सांगितली नाही. या फोनची प्री ऑर्डर सुरु आहे आणि हा फोन जुलैपासून विकत घेता येईल.