फक्त 6299 रुपयांमध्ये आला भन्नाट स्मार्टफोन; Tecno Pop 5 LTE मध्ये आहे 5000mAh ची दणकट बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 04:35 PM2022-01-12T16:35:11+5:302022-01-12T16:35:41+5:30
Budget Smartphone: Tecno Pop 5 LTE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.
Tecno Pop 5 LTE भारतात लाँच करण्यात आला आहे. कमी किंमतीत चांगले फीचर्स देण्याची परंपरा कंपनीनं कायम राखली आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 14 भारतीय भाषांचा सपोर्ट दिला आहे. हा मोबाईल अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.
Tecno Pop 5 LTE ची किंमत
टेक्नो पॉप 5 LTE ची किंमत 6,299 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून 16 जानेवारीपासून विकत घेता येईल. कंपनीनं हा डिवाइस Deepsea Luster, Ice Blue आणि Turquoise Cyan कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.
Tecno Pop 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो पॉप 5 एलटीईची बॉडी पॉलिकार्बोनेट अर्थात प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे. यात डॉट नॉच डिजाईन असलेला मिळतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत परंतु तळाला रुंद चीन दिसते. Tecno POP 5 LTE फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड फोन UNISOC SC9863 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी PowerVR GE8322 GPU देण्यात आला आहे. कंपनीनं यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.
टेक्नो पॉप 5 एलटीईच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 0.3 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. डिवाइसमधील 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देखील फ्लॅश लाईटने सुसज्ज आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं. टेक्नो पॉप 5 एलटीई मध्ये कंपनीनं 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.
हे देखील वाचा:
15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर